TRENDING:

Digestion : पोटाच्या आरोग्यासाठी महत्त्वाचे पाच उपाय, पोटाचं आरोग्य उत्तम तर प्रकृती उत्तम

Last Updated:

पोट स्वच्छ राहण्यासाठी रोज गरम पाणी पिणारे अनेकजण आहेत. पण ते प्यायल्यानंतरही पोट साफ होत नसेल तर आणखी काही उपाय करता येतील.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : आपलं आरोग्य अवलंबून असतं पोटाच्या आरोग्यावर. पोट स्वच्छ राहण्यासाठी रोज गरम पाणी पिणारे अनेकजण आहेत. पण ते प्यायल्यानंतरही पोट साफ होत नसेल तर आणखी काही उपाय करता येतील. ज्यामुळे  आतड्यांमध्ये साचलेली सर्व घाण बाहेर पडेल आणि पोट रिकामं होईल. कारण पोट साफ झालं नसेल तर अनेक प्रकारच्या आजारांना निमंत्रण मिळतं. अनेकदा काही दिवस पोट साफ होत नसल्यामुळे पोट फुगतं आणि दुखायला लागतं.
News18
News18
advertisement

जीवनशैलीमुळे अनेकांना पोटाशी संबंधित समस्यांना सामोरं जावं लागतं. बद्धकोष्ठता, अपचन, पोट फुगणं यासारख्या समस्या जाणवतात. या समस्यांपासून सुटका मिळवण्यासाठी अनेकजण गरम पाणी पितात, पण गरम पाणी प्यायल्यानंतरही पोट साफ होत नसेल तर हे पाच उपाय लक्षात ठेवा.

Skin Care : त्वचेच्या आरोग्यासाठी करा तेलांचा वापर, त्वचेचं होईल संरक्षण

पहिला उपाय:

advertisement

तुमच्या आहारात फायबरचं प्रमाण पुरेशा प्रमाणात ठेवा. पचनसंस्था निरोगी ठेवण्यासाठी फायबर खूप महत्वाचं आहे. यामुळे शौचास सुलभता येते. त्यामुळे आहारात फायबर समृद्ध फळं, भाज्यांचा समावेश नक्की करा.

दुसरा उपाय:

पुरेशा प्रमाणात पाणी प्या. पाणी तुमच्या शरीराला हायड्रेट ठेवण्यास आणि मल मऊ करण्यास मदत करते. दररोज किमान 8 ग्लास पाणी पिण्याचा सल्ला तज्ज्ञ देतात.

advertisement

तिसरा उपाय:

नियमित व्यायाम करा. व्यायामामुळे तुमच्या पचनसंस्थेला चालना मिळते आणि तुम्हाला मल बाहेर काढण्यास मदत होते. दररोज किमान 30 मिनिटं मध्यम तीव्रतेचा व्यायाम करण्याची शिफारस त्यासाठी केली जाते.

Skin Care : त्वचेसाठी रामबाण उपाय - नारळाचं तेल, त्वचा राहिल मुलायम

चौथा उपाय:

काही घरगुती उपाय जसं की त्रिफळा चूर्ण, इसबगोल आणि जीरं यामुळे तुमचं पोट साफ करण्यास मदत होते. पण हे उपचार करण्यापूर्वी, आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

advertisement

पाचवा उपाय:

तणाव टाळा. तणावामुळे तुमच्या पचनसंस्थेवर परिणाम होऊ शकतो आणि बद्धकोष्ठता होऊ शकते. तणाव टाळण्यासाठी, तुम्ही योग, ध्यान किंवा इतर विश्रांती तंत्रांचा सराव करू शकता. हे उपाय करूनही तुम्हाला आराम मिळत नसेल तर तुम्ही तुमच्या डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या.

पोटाच्या आरोग्यासाठी महत्त्वाच्या टिप्स :

advertisement

तुमची खाण्याची वेळ नियमित करा.

हळूहळू खा आणि नीट चावून खा.

खूप मसालेदार किंवा तेलकट पदार्थ टाळा.

धूम्रपान आणि मद्यपान टाळा.

मराठी बातम्या/लाइफस्टाईल/हेल्थ/
Digestion : पोटाच्या आरोग्यासाठी महत्त्वाचे पाच उपाय, पोटाचं आरोग्य उत्तम तर प्रकृती उत्तम
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल