Skin Care : त्वचेसाठी रामबाण उपाय - नारळाचं तेल, त्वचा राहिल मुलायम

Last Updated:

कोरड्या त्वचेच्या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी आणि चेहऱ्याला तजेलदार बनवण्यासाठी खोबरेल तेल खूप उपयुक्त आहे. 

News18
News18
मुंबई : तुमची त्वचा कोरडी असेल तर ही माहिती तुमच्यासाठी महत्त्वाची. कोरड्या त्वचेच्या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी आणि चेहऱ्याला तजेलदार बनवण्यासाठी खोबरेल तेल खूप उपयुक्त आहे.
नारळाच्या तेलाचा केवळ अन्नातच नव्हे तर त्वचेची निगा आणि केसांची निगा राखण्यासाठी खूप उपयोग होतो. या तेलामध्ये दाहक-विरोधी गुणधर्म असतात जे त्वचेचा कोरडेपणा दूर करतात आणि त्वचेला ओलावा देतात. याशिवाय खोबरेल तेलामध्ये लॉरिक ॲसिड असतं आणि हे तेल अँटीमाइक्रोबियल गुणधर्मांचाही चांगला स्रोत आहे.
advertisement
त्वचा कोरडी असेल तर खोबरेल तेल लावल्यानं चेहऱ्यावरील कोरडेपणा दूर होतो आणि तो चमकतो. हे तेल नुसतंही चेहऱ्यावर लावता येतं, पण त्यात आणखी काही गोष्टी मिसळून लावल्यास त्याचा परिणाम जास्त दिसून येतो.
खोबरेल तेलात 'व्हिटॅमिन ई'चे गुणधर्म देखील असतात. तळहातावर खोबरेल तेलाचे 2 थेंब घेऊन चेहऱ्यावर आणि मानेला नीट लावा. रात्री झोपण्यापूर्वी चेहऱ्यावर खोबरेल तेल लावू शकता. यामुळे त्वचा मॉइश्चराइज होते.
advertisement
खोबरेल तेल आणि हळद
त्वचा चमकदार होण्यासाठी नारळाचं तेल लावा. हळदीतील अँटी-ऑक्सिडंट्स आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म त्वचेसाठी उपयुक्त ठरतात. तळहातावर थोडं खोबरेल तेल घ्या आणि त्यात चिमूटभर हळद घाला. हे मिश्रण चेहऱ्यावर चोळा आणि 20-25 मिनिटं ठेवा आणि नंतर ते धुवा.
advertisement
नारळ तेल आणि मध
कोरड्या त्वचेवर खोबरेल तेल आणि मध देखील लावू शकता. यासाठी खोबरेल तेल आणि मध समान प्रमाणात मिसळा. हे मिश्रण चेहऱ्यावर 10 ते 20 मिनिटं लावून ठेवा आणि नंतर चेहरा धुवा. त्वचेचा कोरडेपणा तर दूर होईल.
चेहऱ्यावर खोबरेल तेल लावल्यामुळे त्वचेच्या स्नायूंना आराम मिळतो. खोबरेल तेलातील हेल्दी फॅटी ॲसिड्स उत्तम मॉइश्चरायझर म्हणून काम करतात. कोरड्या वाऱ्यापासून त्वचेचं संरक्षण करण्यासाठी खोबरेल तेल प्रभावी आहे. नारळाचं तेल मेकअप रिमूव्हर म्हणूनही वापरलं जातं. त्यामुळे त्वचेवर साचलेली धूळही निघते. चेहऱ्यावरच्या सुरकुत्या कमी करण्यासाठी खोबरेल तेल उपयुक्त आहे. पापण्या आणि भुवयांचे केस वाढवण्यासाठी, दाट करण्यासाठी खोबरेल तेल लावता येतं. ओठांवर खोबरेल तेल लावल्यानं ओठ फुटण्याची समस्या दूर होते. खोबरेल तेल लावल्यानं ओठ मऊ राहतात.
view comments
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/हेल्थ/
Skin Care : त्वचेसाठी रामबाण उपाय - नारळाचं तेल, त्वचा राहिल मुलायम
Next Article
advertisement
BMC Shiv Sena UBT: बहुमत तुमचं, पण सभागृह आमचं! भाजप-शिंदेंना घाम फोडण्यासाठी ठाकरेंनी निवडला फायरब्रँड शिलेदार
बहुमत तुमचं, पण सभागृह आमचं! भाजप-शिंदेंना घाम फोडण्यासाठी ठाकरेंनी निवडला फायरब
  • राजकीय संघर्षाचे केंद्र महापालिका सभागृहाकडे सरकले आहे.

  • ठाकरे गटाने विरोधी बाकावर बसण्याची तयारी केली असल्याचे चित्र आहे.

  • ठाकरे गटाच्या नगरसेवकांच्या गटनेते पदी आक्रमक चेहरा देण्यात आला आहे.

View All
advertisement