थकवा, पाय आणि घोट्यांमधे सूज येणं, लघवीच्या रंगात बदल, वारंवार लघवी होणं किंवा लघवीतून रक्त येणं श्वास घेण्यास त्रास होणं, मळमळ उलट्या होणं आणि भूक न लागणं अशी लक्षणं तुम्हाला जाणवत असतील तर वेळीच सावध व्हा. कारण ही सर्व लक्षणं मूत्रपिंडं निकामी होण्याची आहेत. किडनी म्हणजेच मूत्रपिंडं निरोगी ठेवायची असतील तर योग्य आहार आवश्यक आहेच, तसंच काही अननस, सफरचंद, लसूण, फ्लॉवर मूत्रपिंडांसाठी उपयुक्त ठरु शकतात.
advertisement
Anulom Vilom : शरीराला आणि मनालाही मिळेल ऊर्जा, अनुलोम - विलोम नक्की करा
अननस -
अननसात व्हिटॅमिन सी आणि कॅल्शियम भरपूर प्रमाणात असतं. त्यामुळे अननस मूत्रपिंडांसाठी खूप फायदेशीर मानलं जातं.
लसूण-
लसूण ही औषधी वनस्पती आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानली जाते. त्यातला अॅलिसिन नावाचा घटक मूत्रपिंड निरोगी ठेवण्यासाठी आणि अनेक आजारांपासून संरक्षण करण्यासाठी उपयुक्त आहे.
Tanning : टॅनिंग काढण्यासाठी दही पॅक, चेहऱ्यासाठी सुरक्षित उपाय
सफरचंद-
सफरचंदांमधे अँटीऑक्सिडंट्स आणि फायबर भरपूर प्रमाणात असतात, तर त्यात पोटॅशियम, फॉस्फरस आणि सोडियमचं प्रमाण कमी असतं, ज्यामुळे ते किडनीसाठी फायदेशीर ठरतात.
फुलकोबी-
फुलकोबीत पोटॅशियमचं प्रमाण कमी असतं आणि त्यात जीवनसत्त्वं आणि अँटिऑक्सिडंट्स तसंच व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन के, फोलेट आणि फायबर सारखे गुणधर्म भरपूर असतात. हे सर्व घटत आरोग्यासाठी खूप चांगले मानले जातात.
