काय आहे व्हर्टिगो आजार?
काही वेळा आपल्याला चक्कर येते किंवा गरगर फिरल्यासारखे वाटते. काही लोकांना कमी ऐकायला येते. असा त्रास होत असेल तर आपल्याला व्हर्टिगो आजार असू शकतो. व्हर्टिगो आजारामध्ये चक्कर येण्याची वेगवेगळी कारणं असतात. यामध्ये कानाचे आजार, डोळ्यांचे आजार, बीपी लो असणं, ब्रेन ट्युमर या कारणांमुळे अचानकच चक्कर येऊ शकते. कसलीही हालचाल न करता जाग्यावरच गरगरल्यासारखं होतं. अशा आजाराला व्हर्टिगो म्हटलं जातं, असं डॉ बारकुल सांगतात.
advertisement
डिझेल कारमध्ये पेट्रोल भरले तर कधीही करु नका ‘ही’ चूक!
व्हर्टिगो अटॅकची लक्षणं काय?
व्हर्टिगो अटॅकची वेगवेगळी लक्षणं आहेत. मागं पुढं ढकलल्यासारखं होणं, तोल गेल्यासारखं वाटणं, डोकेदुखी, डोळ्यांवर अंधारी आल्यासारखं वाटणं, गोलगोल फिरणं, अशी याची लक्षणं आहेत. यावर आपण वेळीच सावध होऊन डॉक्टरांचा सल्ला घेतला पाहिजे. फिजिशियन अथवा न्यूरो सर्जनकडून योग्य उपचार करून घेतल्यास यावर मात करता येऊ शकते, असं डॉक्टर सांगतात.
व्हर्टिगोचे प्रकार किती?
सेंट्रल आणि पेरीफेरल असे दोन प्रकार व्हर्टिगोचे आहेत. पेरीफेरल हे कानाच्या आजाराने होतात. सेंट्रल हे मेंदूच्या आजाराने होतात. मल्टीपल स्क्लेरोसिक्स यानेही चक्कर येऊ शकते. तिसरा प्रकार दोन्हीचा मिक्स असतो. पहिला आणि दुसरा मणका याचे आजार, मेंदूच्या आवरणाचा आजार, थायरॉईडचे आजार यामुळे हा होतो. सारखे सारखे फिरल्यासारखे होणे, झोपल्यावर पोझिशन बदलल्यावर चक्कर येणे, त्यानंतर काही सेकंदात ती पुन्हा जाणे अशी लक्षणे यात दिसतात.
गावात जायला रस्ता नाही पण बीडच्या अविनाशनं केला गोल्ड मेडलचा अडथळा पार!
रोगनिदान कसं करावं?
व्हर्टिगोची काही लक्षणे दिसताच आपण तत्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. त्यांच्या सल्ल्यानुसारच ऑडीओग्राम डोळ्यांच्या बाहुल्यांची तपासणी ( निस्टॅग्मोग्राफी), एमआरआय, मेंदूची अँजिओग्राफी आदी उपयुक्त तपासण्या करून घ्याव्यात, असा सल्ला डॉक्टर देतात.