Pitru Paksha: पितृपक्षात पिंडदान करण्यासाठी नाशिकला का होते गर्दी? श्रीरामांशी आहे थेट संबंध
- Published by:Vrushali Kedar
- Reported by:Kunal Santosh Dandgaval
Last Updated:
Pitru Paksha: पितृ पक्षात अनेक लोक आपल्या घरातील पितरांचं पिंड दान आणि श्राद्ध विधी करण्यासाठी नाशिकला येतात.
नाशिक: गोदावारीकाठी वसलेल्या आणि 12 ज्योर्तिलिंगांपैकी एक असलेल्या त्र्यंबकेश्वरमध्ये पितृ पक्षात मोठी गर्दी असते. पितृ पक्षात अनेक लोक आपल्या घरातील पितरांचं पिंड दान आणि श्राद्ध विधी करण्यासाठी याठिकाणी येतात. पितृ पंधरवाड्यात त्र्यंबकेश्वरमध्ये नारायण नागबली आणि त्रिपिंडी हे विधी करण्याला देखील फार महत्व आहे. नाशिक येथील पुजारी समीर जोशी यांनी लोकल 18शी बोलताना या विधींचं धार्मिक महत्त्व सांगितलं आहे.
भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्षाला पितृ पक्ष मानलं जातं. याला 'महालय' असंही म्हणातात. आपल्या नातेवाईकाचा मृत्यू ज्या तिथीस झाला असेल त्याचं श्राद्ध पितृपक्षातील त्याच तिथीला करण्याची हिंदू परंपरा आहे. या निमित्ताने आपल्या दिवंगत पूर्वजांचे स्मरण केलं जातं. याशिवाय, नाशिक येथील रामकुंड व त्र्यंबकेश्वर या ठिकाणी पितृ पक्षात पिंड दान, नारायण नागबली आणि त्रिपिंडी विधी देखील केले जातात. या मागे देखील धार्मिक कारणं आहेत.
advertisement
प्रभू श्रीरामांनी वनवासात असताना आपल्या वडिलांचं पिंड दान नाशिकमधील पंचवटीत गोदाकाठी केलं होतं. तेव्हापासून अशी आख्यायिका आहे की, मृत व्यक्तीच्या अस्थि राम कुंडात विसर्जित केल्यास त्याला मोक्ष मिळतो. असं म्हणतात की, याठिकाणी विसर्जित केलेल्या अस्थिंचं अवघ्या तीन तासात पाण्यात रुपांतर होतं. या ठिकाणी पिंड दान व श्राद्ध केल्यास आपल्या पितराना शांति व मोक्ष प्राप्त होतो.
advertisement
पितृ पक्षात त्र्यंबकेश्वर येथे नारायण नागबली आणि त्रिपिंडीची पूजा केली जाते. याबाबत असं सांगितलं जातं की, या ठिकाणी ब्रम्हा,विष्णु आणि महेश विराजीत आहेत. याच ठिकाणाहून दक्षिण गंगा म्हणजेच गोदावरीचा उगम झालेलाआहे. त्यामुळे याठिकाणी केलेला नारायण नागबली पूजाविधी पूर्वजांना शांती मिळवून देतो. या पूजेमुळे कुटुंबात सुख-समृद्धी येते आणि जीवनातील समस्या दूर होतात, अशी धार्मिक श्रद्धा आहे.
Location :
Nashik,Maharashtra
First Published :
September 08, 2025 4:04 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Pitru Paksha: पितृपक्षात पिंडदान करण्यासाठी नाशिकला का होते गर्दी? श्रीरामांशी आहे थेट संबंध