दही खाणं आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानलं जातं. रोज एक वाटी दही खाल्ल्यानं शरीराला दह्यामध्ये असलेलं प्रोटीन, व्हिटॅमिन, कॅल्शियम, आयर्न, फॉस्फरस, मॅग्नेशियम आणि फॉलिक ॲसिडसारखे घटक शरीराला आवश्यक आहेत. जे शरीराला अनेक समस्यांपासून वाचवण्यास मदत करतात.
Healthy Juice : पालक, गाजर आणि बीटाचा रस प्या, आरोग्याच्या अनेक समस्या होतील दूर
advertisement
तुम्हाला पोटाशी संबंधित समस्या असतील तर तुम्हीही दही खा. पण एक गोष्ट लक्षात ठेवा की, दही फक्त दिवसा खा आणि जर तुम्हाला सर्दी-खोकल्याचा त्रास असेल तर शक्यतो टाळा.
दही खाण्याचे फायदे
1. पचन
दह्यामध्ये प्रोबायोटिक्स असतात, जे पोटातील चांगले बॅक्टेरिया वाढवण्यास मदत करतात. पचनाची समस्या असेल तर दही खाणं हा एक चांगला पर्याय आहे. यामुळे बद्धकोष्ठता, अपचनाचा त्रास कमी करता येतो.
2. प्रतिकारशक्ती
दह्यामध्ये व्हिटॅमिन सी मुबलक प्रमाणात आढळतं, ज्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यास मदत होते. रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करायची असेल आणि आजारांपासून दूर राहायचं असेल तर तुम्ही रोज एक वाटी दही खाऊ शकता.
Weight Gain: वजन वाढवण्यासाठी महत्त्वाच्या टिप्स... खजूर- चणे ठरतील उपयुक्त
3. हाडांची मजबुती
दह्यामध्ये कॅल्शियम आढळतं कॅल्शियम आपल्या हाडांसाठी आवश्यक आहे. हाडांच्या मजबुतीसाठी दही आवश्यक आहे.
4. त्वचा
दह्यामध्ये लॅक्टिक ॲसिड आढळतं, ज्यामुळे त्वचेला हायड्रेट ठेवणं आणि पोषणासाठी मदत होते. रोज एक वाटी दही खाल्ल्यानं त्वचा निरोगी राहण्यास मदत होते.
5. रक्तदाब नियंत्रण
रक्तदाबाच्या रुग्णांसाठी दही खाणं फायदेशीर मानलं जातं. पण एक गोष्ट लक्षात ठेवा की आहारात कोणताही बदल करण्यापूर्वी एकदा डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्या.