TRENDING:

रोज सकाळी फक्त 30 मिनिटे हे करा, तुम्हाला दवाखान्याची पायरीच चढावी लागणार नाही!

Last Updated:

Morning Workout: रोज सकाळी फक्त 30 मिनिटं व्यायाम केल्यास आरोग्यपूर्ण जीवन जगता येते. याबाबत कोल्हापुरातील जिम ट्रेनर ओंकार परदेशी यांनी माहिती दिलीये.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
निरंजन कामत, प्रतिनिधी
advertisement

कोल्हापूर : हेल्दी राहण्यासाठी शरीराला हेल्दी डाएटसारखीच व्यायामाची गरज असते. व्यायाम केवळ आपल्या शरीरातील लठ्ठपणाच कमी करत नाही, तर त्याचे अनेक इतर फायदे देखील आहेत. नियमित व्यायामामुळे अनेक आजारांचा धोका कमी होतो, शरीरातील एनर्जी स्थिर राहते आणि मेंदू सक्रिय राहतो. सकाळच्या वेळी व्यायाम करण्याचे विशेष फायदे आहेत, जे आपल्या शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण ठरू शकतात. यासंदर्भात सकाळच्या वेळी कोणते व्यायाम केल्याने तुम्हाला कोणते फायदा मिळतील? याबाबत कोल्हापुरातील जिम ट्रेनर आणि बॉडी बिल्डिंग क्षेत्रात कार्यरत असणारे ओंकार परदेशी यांनी सविस्तर माहिती दिली आहे.

advertisement

चालण्याचे फायदे : सकाळच्या वेळी जॉगिंग करणे अत्यंत फायदेशीर ठरते. लठ्ठपणा, पोटावरील चरबी कमी करण्यासह तुमचे मसल्स अधिक मजबूत होण्यासाठी या व्यायामाचा उपयोग होतो. रोज सकाळी साधारण 15 मिनिटे धावल्याच्या व्यायाम केल्याने अनेक आजारांपासून दूर राहता येतं. 1 आठवड्यातच तुम्हाला याचा अनुभव येतो आणि तुम्हालाही याची सवय लागते.

उन्हाळ्यात तोंडावर मास्क वापरावा की नाही? डाॅक्टरांनी दिला 'हा' महत्त्वाचा सल्ला... 'फायद्याचं की तोट्याचं'

advertisement

View More

पुश अप्स : रोज सकाळी तुम्ही वॉर्म अप केल्यानंतर कमीत कमी साधारण 10-15 मिनिट्स पुशअप्स करावे. पुश अप्सचा व्यायाम केल्याने हात आणि खाद्यांच्या मांसपेशी टोन्ड होतात आणि वजन वाढीलाही रोख लागते. सुरूवातीला साधारण 15 मिनिट्स पुशअप्स करावे. पण तुम्हाला सुरूवातीला हे अधिक वेळ वाटत असेल तर तुम्ही पहिले 10 मिनिट्स करून मग त्याची वेळ वाढवावी.

advertisement

जम्पिंग जॅक : सकाळी जर तुम्हाला व्यायाम करायचा असेल तर योग्य व्यायाम म्हणजे जंपिंग जॅक्स. मांसपेशी, हाडांना मजबूत करण्यासाठी तुम्ही हा व्यायाम नक्की निवडावा. शरीरातील आळस आणि कमकुवतपणा कमी करण्यासाठी जंपिंग जॅक्सची मदत मिळते. रोज 15 मिनिट्स जंपिंग जॅक्सचा व्यायाम हा आरोग्य चांगले राखण्यासाठी आणि अनेक आजारांपासून दूर राहण्यासाठी फायदेशीर ठऱतो.

advertisement

स्कॉट्स : रोज सकाळी उठून तुम्ही फिटनेस फ्लॅनमध्येही स्क्वॉट्स समाविष्ट करून घेऊ शकता. असे केल्याने तुम्ही कायम फिट राहता आणि शरीरामध्ये आजार निर्माण होत नाहीत. स्क्वाट्स कुठेही करता येऊ शकतात. तसंच कॅलरी बर्न करून व्यायामाचा हा एक उत्तम पर्याय तुम्हाला निवडून त्याचा वापर करून घेता येतो.

सकाळच्या वेळी व्यायाम करण्याचे फायदे अनेक आहेत. व्यायामाचा फायदा आपल्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर मोठ्या प्रमाणात पडतो. सकाळच्या वेळी व्यायाम केल्याने शरीराला उत्तम ऊर्जा मिळते आणि दिवसभराच्या कामामध्ये कार्यक्षमतेत वाढ होते.

Skin Care: तुमचीही त्वचा तेलकट आहे? उन्हाळ्यात खाज सुटण्याचा धोका, लगेच करा हा उपाय

सकाळच्या व्यायामाचे फायदे

  1. उत्तम ऊर्जा: सकाळी व्यायाम केल्याने संपूर्ण दिवसभरासाठी शरीरात ऊर्जा आणि उत्साह टिकून राहतो. व्यायामामुळे रक्ताभिसरण वाढते, ज्यामुळे शरीरात प्राणवायूचा पुरवठा सुधारतो आणि शरीराची कार्यक्षमता वाढते.
  2. वजन नियंत्रण: सकाळी व्यायाम केल्याने आपला मेटाबोलिजम वेगवान होतो. त्यामुळे दिवसभर अधिक कॅलोरी जाळली जातात, आणि वजन नियंत्रित ठेवण्यासाठी मदत मिळते.
  3. मानसिक स्वास्थ्य: व्यायाम केल्यामुळे शरीरात एंडोर्फिन्स (हॅप्पी हार्मोन्स) तयार होतात, ज्यामुळे मानसिक ताण कमी होतो आणि आपल्याला एक सकारात्मक आणि आनंदी अनुभव मिळतो.
  4. हार्ट हेल्थ: सकाळच्या वेळेत व्यायाम केल्याने हृदयाचे आरोग्य सुधारते. व्यायामामुळे हृदयाची कार्यक्षमता वाढते आणि रक्तदाब सामान्य राहतो.
  5. स्ट्रोक आणि डायबिटीजचा धोका कमी होतो: नियमित व्यायामामुळे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवली जाते आणि हृदयरोग आणि स्ट्रोकचा धोका कमी होतो.
  6. स्ट्रेचिंग आणि लवचिकता: सकाळी हलके स्ट्रेचिंग व्यायाम केल्याने शरीराची लवचिकता वाढते, मांसपेशी आणि सांधे यांना आराम मिळतो, आणि शारीरिक दुखापतींना प्रतिबंध होतो.
  7. टॉप व्हिडीओज

    सर्व पहा
    शेतकऱ्याच्या स्वप्नांचा चुराडा, तासाभरात 40 लाखांचा चिखल, ‘त्या’ काळरात्रीमुळं सगळेच हतबल!
    सर्व पहा

मराठी बातम्या/लाइफस्टाईल/हेल्थ/
रोज सकाळी फक्त 30 मिनिटे हे करा, तुम्हाला दवाखान्याची पायरीच चढावी लागणार नाही!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल