नेहमीच्या चहापेक्षा ग्रीन टी पिणं कधीही चांगलं असतं. कारण त्यामध्ये भरपूर प्रमाणात पोषक घटक असतात आणि ते आपल्या शरीरासाठी फायदेशीर ठरतात. ज्यांना वजन कमी करायचं आहे, ते तर आवर्जून ग्रीन टी पितात. त्यामुळे वजन घटण्यास मदत होते. ग्रीन टी मध्ये एल-थियानिन हे ऍसिड असतं आणि हे आपली एक ट्रेस लेव्हल कमी करायला मदत करते. तसंच यामध्ये एक कॅटेचिन नावाचा घटक असतो जो आपल्या पेशी डॅमेज होण्यापासून वाचवतो, असं आहारतज्ज्ञ सांगतात.
advertisement
ताण-तणाव जास्त असणारे आणि मधुमेहाचा त्रास अधिक असणारे आर्जून ग्रीन टी पितात. त्यामुळे शुगर कंट्रोलमध्ये राहण्यास मदत होते. जर तुम्हाला ग्रीन टी द्यायची असेल तर ती तुम्ही डिकॅफिनेटेड असलेली ग्रीन टी घ्यावी. तसंच त्याचं प्रमाण देखील कमी असावं. तुम्ही दिवसातून फक्त दोन वेळेस ग्रीन टी घ्यावी. एक तर सकाळच्या वेळेमध्ये आणि एक संध्याकाळी सात वाजेच्या आतमध्येच घ्यावी. त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही जास्त वेळा ग्रीन टी घेऊ नये, असं आहारतज्ज्ञांनी सांगितलं आहे.
तुम्ही ग्रीन टी घरी देखील तयार करू शकता. त्यामध्ये तुम्ही घरातले आयुर्वेदिक मसाले वापरू शकता. तसेच बाजारात देखील चांगल्या ब्रँडचे ग्रीन टी उपलब्ध आहेत. ते देखील घेऊ शकता असं आहारतज्ज्ञ सांगतात.