मूत्रपिंड निरोगी असतील तर शरीराला चांगली ऊर्जा, संतुलित रक्तदाब आणि चांगलं आरोग्य राखण्यास मदत होते. योग्य आहार घेतला तर मूत्रपिंड दीर्घकाळ मजबूत आणि निरोगी राहतात. त्यामुळे मूत्रपिंडांचं आरोग्य चांगलं राखण्यासाठी चांगला संतुलित आहार महत्त्वाचा आहे.
आहारातील या महत्त्वाच्या घटकांमुळे मूत्रपिंडांचं कार्य सुधारण्यास मदत होईल. पोषक घटकांनी समृद्ध अन्न मूत्रपिंडांच्या शुद्धीकरण प्रक्रियेबरोबरच हानिकारक घटकांपासूनही संरक्षण करण्यासाठीही उपयुक्त ठरेल.
advertisement
मूत्रपिंडांच्या आरोग्यासाठी पोषक घटक
1. ब्लूबेरी - अँटिऑक्सिडंट्सचा साठा
ब्लूबेरीत अँटिऑक्सिडंट्स आणि अँथोसायनिन्स भरपूर असतात, ऑक्सिडेटिव्ह तणावापासून मूत्रपिंडाच्या पेशींचं संरक्षण करण्यासाठी ब्लूबेरी उपयुक्त आहेत. ब्लूबेरी हे फळ मूत्रपिंडांना सूज येण्यापासून वाचवतं आणि त्यांचं कार्य यामुळे सुधारतं.
Hair Growth : केसांच्या वाढीसाठी रामबाण उपाय, तुमच्या घरातच आहे उत्तर
2. मासे - ओमेगा-3 फॅटी एसिडचा साठा
सॅल्मन, ट्यूना आणि मॅकरेल सारख्या फॅटी माशांमधे ओमेगा-3 फॅटी एसिड भरपूर प्रमाणात असतं, यामुळे सूज कमी करून मूत्रपिंड निरोगी ठेवता येतात. याशिवाय, माशांमधे उच्च दर्जाची प्रथिनं असतात, यामुळे मूत्रपिंडांचं कार्य सुधारतं.
3. पालक - लोह आणि जीवनसत्त्वांचं पॉवरहाऊस
पालकात व्हिटॅमिन ए, सी आणि लोह भरपूर प्रमाणात असतं, यामुळे रक्ताभिसरण सुधारणं आणि मूत्रपिंड स्वच्छ करण्यास मदत होते. पण पौष्टिक असले तरी हे घटक माफक प्रमाणात खाण्याचा सल्ला दिला जातो. कारण जास्त पालकातील ऑक्सलेटमुळे किडनी स्टोन होण्याची शक्यता असते.
4. लसूण - नैसर्गिक डिटॉक्सिफायर
लसूणमध्ये दाहक-विरोधी आणि जीवाणूविरोधी गुणधर्म भरपूर असतात. मूत्रपिंडातील विषारी पदार्थ बाहेर काढणं आणि रक्तदाब नियंत्रित करण्यासाठी तसंच यामुळे मूत्रपिंड दीर्घकाळ निरोगी राहण्यासाठी मदत होते.
Eyesight : डोळ्यांसाठी पौष्टीक आहार, नैसर्गिक घटकांनी वाढेल डोळ्यांची ताकद
5. ग्रीन टी - किडनी स्वच्छ करण्यासाठी उत्तम पर्याय
ग्रीन टीमधे असलेले पॉलीफेनॉल आणि अँटीऑक्सिडंट्स किडनी स्वच्छ करण्यासाठी आणि हानिकारक घटकांपासून त्यांचं संरक्षण करण्यास मदत करतात. ग्रीन टी नियमितपणे प्यायल्यानं मूत्रपिंडांचं कार्य सुधारतं आणि विषारी पदार्थ काढून टाकण्याची प्रक्रिया वेगवान होते.
मूत्रपिंड निरोगी ठेवण्यासाठी योग्य आहार घेणं खूप महत्वाचं आहे. आहारात ब्लूबेरी, मासे, पालक, लसूण आणि ग्रीन टी यांसारखे निरोगी पदार्थ समाविष्ट करून मूत्रपिंड वर्षानुवर्षं तंदुरुस्त ठेवू शकता. तसंच, पुरेसं पाणी पिणं आणि प्रक्रिया केलेलं अन्न खाणं टाळणं हे देखील मूत्रपिंडाच्या आरोग्यासाठी महत्त्वाचं आहे.