TRENDING:

हिवाळ्यात रोज एक पेरू खा अन् स्वस्थ राहा! आश्चर्यकारक फायदे माहितीये का?

Last Updated:

Guava Benefits: हिवाळ्यात पेरू खाणे अत्यंत आरोग्यदायी मानलं जातं. पेरूने थंडीत सर्दी खोकला होतो का? याबाबत आहारतज्ज्ञांनी माहिती दिलीये.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
अपूर्वा तळणीकर, प्रतिनिधी
advertisement

छत्रपती संभाजीनगर : उत्तम आरोग्यासाठी आयुर्वेदात फलाहार महत्त्वाचा मानला जातो. प्रत्येक ऋतूमध्ये वेगवेगळी फळे येत असतात. आता हिवाळा सुरू असून या काळात पेरूचा हंगाम असतो. त्यामुळे आता बाजारात मोठ्या प्रमाणात पेरू विक्रीसाठी आलेले आहेत. पेरू आरोग्यासाठी अत्यंत लाभादायी मानला जातो. पेरू खाण्याचे आरोग्यासाठी नेमके काय फायदे होतात? याविषयी छत्रपती संभाजीनगर येथील आहारतज्ञ्ज मंजू मठाळकर यांनी माहिती दिलीये.

advertisement

वजन नियंत्रणासाठी लाभदायी

हिवाळ्यात पेरूचा हंगाम असतोच. या काळात प्रत्येकाने आपल्या दररोजच्या आहारामध्ये पेरूचा समावेश करणे अत्यंत गरजेचं आहे. पेरूमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये विटामिन सी असतं आणि हे आपल्या शरीरासाठी अत्यंत फायदेशीर आहे. ज्या व्यक्तींना मधुमेह आहे अशा व्यक्तीने दिवसभरामधून 100 ते 150 ग्राम एवढा पेरू खावा. म्हणजे साधारणपणे एक मध्यम आकाराचा पेरू आपल्या आहारामध्ये घेणे गरजेचे आहे. त्यासोबतच वजन नियंत्रित ठेवण्यासाठी देखील पेरू हा मदत करत असतो.

advertisement

चायनीज पदार्थांमध्ये वापरले जाणारे अजिनोमोटो शरीरासाठी फायदेशीर असतं का? तज्ज्ञ काय म्हणतात पाहा Video

पेरूने सर्दी, खोकला होतो का?

अनेक लोकांचा गैरसमज असतो की पेरू खाल्ल्यानंतर आपल्याला सर्दी किंवा खोकला होईल. पण हा अत्यंत चुकीचा गैरसमज आहे. कारण पेरू खाल्ल्यानंतर तुमच्या शरीरात जो साठलेला कफ असतो. तो बाहेर पडायला मदत होते.त्यामुळे हा गैरसमज तुम्ही मनातून काढून टाकावा आणि प्रत्येकाने पेरू खावा. हिवाळ्यात शरीरामध्ये ऊर्जा आणण्यासाठी पेरू मदत करत असतो. पेरूच्या बियामध्ये देखील भरपूर असं पोटॅशियम असतं आणि ते अत्यंत फायदेशीर आहे, असं आहारतज्ज्ञ सांगतात.

advertisement

रोज किती पेरू खावा?

प्रत्येकाने आपल्या आहारामध्ये साधारणपणे 100 ते 150 ग्राम पेरू खाणं गरजेचे आहे. पेरूमध्ये भरपूर खनिजे असतात. पोटॅशियम, मॅग्नेशियम सारखी खनिजे आपल्या आरोग्यासाठी अत्यंत लाभदायी असतात. पेरू हे फळ हिवाळ्यामध्येच येते. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीनं हिवाळ्यात पेरू खाणं गरजेचं आहे, असं आहारतज्ज्ञ मंजू मठाळकर यांनी सांगितलं आहे.

मराठी बातम्या/लाइफस्टाईल/हेल्थ/
हिवाळ्यात रोज एक पेरू खा अन् स्वस्थ राहा! आश्चर्यकारक फायदे माहितीये का?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल