चायनीज पदार्थांमध्ये वापरले जाणारे अजिनोमोटो शरीरासाठी फायदेशीर असतं का? तज्ज्ञ काय म्हणतात पाहा Video
- Published by:News18 Marathi
Last Updated:
आपल्या पैकी अनेकांना चायनीज पदार्थ खायला खूप आवडतात. मात्र, या चायनीज पदार्थांमध्ये अजिनोमोटो हा प्रामुख्याने मोठ्या प्रमाणात वापरला जाते.
अपूर्वा तळणीकर, प्रतिनिधी
छत्रपती संभाजीनगर : आपल्या पैकी अनेकांना चायनीज पदार्थ खायला खूप आवडतात. नूडल्स मंचुरियन, सूप, फ्राईड राईस, हक्का नूडल्स हे सर्व पदार्थ आपण अगदी आवडीने खातो. मात्र, या चायनीज पदार्थांमध्ये अजिनोमोटो हा प्रामुख्याने मोठ्या प्रमाणात वापरला जाते. अजिनोमोटो हे पदार्थाला चव आणायला मदत करते. पण हे आपल्या शरीरासाठी हानिकारक असते का? अजिनोमोटोने शरीराला फायदा होतो का? आपण हे किती खावं? हे कोणी खाऊ नये? याविषयीच छत्रपती संभाजीनगरमधील आहारतज्ज्ञ अलका कर्णिक यांनी माहिती दिली आहे.
advertisement
अजिनोमोटोने शरीराला फायदा होतो का?
1 ग्राम अजिनोमोटोमध्ये 380 ग्राम एवढं सोडियम आहे. ही सोडियमची मात्रा एवढा मोठ्या प्रमाणात असल्यामुळे ती अत्यंत हानिकारक आहे. अजिनोमोटो पदार्थांना चव आणायला मदत करते. अजिनोमोटो हे आपल्या सर्वांनाचा शरीरासाठी अत्यंत हानीकारक आहे. कोणते ही पदार्थ विकत घेताना त्यामध्ये अजिनोमोटोची किती मात्रा आहे तपासूनच घ्यावे. आणि ज्या पदार्थांमध्ये अजिनोमोटो आहे ते पदार्थ खाणे टाळावे, असं आहारतज्ज्ञ अलका कर्णिक सांगतात.
advertisement
सूर्यनमस्कार करण्याचे आरोग्यदायी फायदे, पण या व्यक्तींनी चुकूनही करू नये, Video
अजिनोमोटो खाल्ल्यानंतर आपल्या भविष्यात उच्च रक्तदाब, हृदयविकार किंवा स्ट्रोक होण्याची शक्यता असते. जर अधिच हे आजार असतील तर हे खाणं टाळावं. जर तुम्हाला पदार्थमध्ये अजिनोमोटो चव आणायची असेल तर तुम्ही आपल्या स्वयंपाक घरामधील लिंबू, आद्रक, काळे मीठ, हळद हे सर्व घटक एकत्र करून सम प्रमाणात जर घेतले तर याची चव ही सेम अजिनोमोटो सारखी लागते, असं आहारतज्ज्ञ अलका कर्णिक सांगतात.
advertisement
अनियमित मासिक पाळी आणि लठ्ठपणा, महिलांच्या समस्यांवर ही योगासने रामबाण उपाय, Video
view commentsअजिनोमोटो हा आपल्या शरीरासाठी हृदयासाठी आणि लिव्हरसाठी अत्यंत धोकादायक आहे. यामुळे शक्यतो अजिनोमोटो असलेले पदार्थ खाणे टाळावे. जर तुम्हाला अजिनोमोटो असेल पदार्थ खायचे असतील तर तुम्ही महिन्यातून किंवा सहा महिन्यातून एखाद्या वेळेसचे पदार्थ खाऊ शकता. पण त्यामध्ये त्याची मात्रा किती आहे हे तपासूनच पदार्थ खावे, असंही आहारतज्ज्ञ अलका कर्णिक सांगतात.
Location :
Chhatrapati Sambhaji Nagar,Maharashtra
First Published :
February 14, 2024 9:13 AM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/हेल्थ/
चायनीज पदार्थांमध्ये वापरले जाणारे अजिनोमोटो शरीरासाठी फायदेशीर असतं का? तज्ज्ञ काय म्हणतात पाहा Video

