वजन कमी असलं तरी बाहेर आलेलं पोट आत कसं जाईल असा प्रश्न अनेकांसमोर असतो. अनेकदा, खाण्याच्या सवयी योग्य नसल्या तर ही समस्या उद्भवू शकते. अशावेळी, पोषणतज्ज्ञांनी सुचवलेलं एक पेय तुमच्यासाठी खूप उपयुक्त ठरू शकतं.
Diabetes : साखर नियंत्रणासाठी या पर्यायांचा करा वापर, मधुमेहाचं प्रमाण होईल कमी
advertisement
पोटाची चरबी कमी करण्यासाठी घरगुती पेय
हे पेय बनवण्यासाठी एक ग्लास पाणी, एक चमचा जिरं, एक चमचा धणे आणि एक चमचा बडीशेप लागेल. पेय तयार करण्यासाठी, सर्व साहित्य पाण्यात घाला आणि 5 मिनिटं उकळवा. बेली फॅट लॉस ड्रिंक तयार आहे. हे पेय गाळून प्या.
Collagen : त्वचा, स्नायू, हाडांसाठी महत्त्वाचा घटक, कमतरतेमुळे बिघडू शकतं शरीराचं संतुलन
यातल्या जिऱ्यामुळे चयापचयाची क्रिया वेगानं होते आणि पचन व्यवस्थित होतं. धणे, बडीशेप खाल्ल्यानं पचन सुधारतं आणि पोट फुगण्याच्या समस्येपासून आराम मिळतो. आहारतज्ज्ञांच्या मते, तुम्ही जर दिवसातून 10,000 पावलं चालत असाल तर तुमच्या शरीराचे वजन झपाट्यानं कमी होऊ लागतं. त्यासोबत शरीराला संतुलित आहाराची गरज असते.
याव्यतिरिक्त, काही डिटॉक्स पेय पोटाची चरबी कमी करण्यासाठी प्रभावी आहेत. तुम्ही तुमच्या दिवसाची सुरुवात चिया सीड्सचं पाणी पिऊन देखील करू शकता. वजन कमी करण्यासाठी हा उपाय परिणामकारक ठरतो. वजन कमी करण्यासाठी मेथीचं पाणी हादेखील चांगला पर्याय आहे.