या तेलामुळे केसांना पोषण मिळेलच शिवाय केस काळे, लांब आणि चमकदार राहतील. तुम्ही हे घरी सहज बनवू शकता. पाहूया यातले काही पर्याय
आवळा तेल
आवळा केसांसाठी वरदान आहे. हे केसांच्या वाढीसाठी आणि केस दाट होण्यासाठी उपयुक्त ठरेल. आवळ्यामध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते, ज्यामुळे केस मजबूत होतात.
Face Acne : चेहऱ्यावरच्या डागांसाठी पारंपरिक उपाय, महागड्या ब्युटी प्रॉडक्टना करा बाय - बाय
advertisement
तेल तयार करण्याची पद्धत -
2-3 ताजे आवळे घ्या आणि त्यांचे लहान तुकडे करा. खोबरेल तेलात टाकून मंद आचेवर गरम करा. तेलाचा रंग हलका तपकिरी झाला की गॅस बंद करुन थंड होऊ द्या. तेल गाळून स्वच्छ बाटलीत साठवा. आठवड्यातून 2-3 वेळा या तेलानं केसांना मसाज करा.
2. मेथी आणि मोहरीचं तेल
मेथीच्या दाण्यामध्ये प्रोटीन आणि लोह असतं, ज्यामुळे केस गळणं थांबतं. मोहरीचं तेल केसांना मुळांपासून मजबूत करतं आणि यामुळे केसांची नैसर्गिक चमक वाढते.
तयार करण्याची पद्धत
एक चमचा मेथी दाणे रात्रभर पाण्यात भिजत ठेवा. सकाळी बारीक करून पेस्ट बनवा. १ कप मोहरीचे तेल गरम करून त्यात मेथीची पेस्ट घाला. तेल थंड करून गाळून घ्या. आठवड्यातून दोनदा याचा वापर करा.
3. कढीपत्ता आणि खोबरेल तेल
कढीपत्त्यात असलेले अँटिऑक्सिडंट्स आणि जीवनसत्त्वं केस पांढरे होण्याचं प्रमाण कमी करतात. या तेलामुळे केस काळे, जाड आणि चमकदार होतात.
तयार करण्याची पद्धत-
कढीपत्त्याची 10-12 पानं उन्हात वाळवा. ही पानं १ कप खोबरेल तेलात टाकून मंद आचेवर गरम करा.
तेलाचा रंग बदलू लागेल आणि त्यात कढीपत्त्याचा सुगंध येऊ लागेल. ते गाळून ठेवा, या तेलाचा नियमित वापर करा.
वापरण्याची पद्धत -
हे तेल हलकं गरम करून टाळूवर आणि केसांच्या मुळांना लावा. हलक्या हातांनी मसाज करा जेणेकरून तेल केसांच्या मुळांपर्यंत पोहोचेल. कमीत कमी २-३ तास किंवा रात्रभर केसांवर तेल राहू दे. सौम्य शैम्पूनं केस धुवा.
यामुळे केस गळणं कमी होतं. पांढऱ्या केसांची समस्या दूर होते. केसांना नैसर्गिक चमक मिळते. डोक्यातील कोंडा आणि टाळूशी संबंधित समस्या दूर होऊ शकतात. या घरगुती तेलांचा नियमित वापर केल्यानं तुमचे केस मजबूत तर होतीलच, शिवाय रासायनिक उत्पादनांपासूनही तुमचा बचाव होईल. या टिप्स वापरून पहा आणि केसांचं आरोग्य जपा.
