TRENDING:

Hair Care Tips : कोरफड, कांद्याचा रस, नारळाचं तेल, आवळा पावडर करेल केसांवर जादू, नक्की वापरुन बघा

Last Updated:

कोरफड हे केसांसाठी वरदान आहे आणि त्यात इतर काही गोष्टी मिसळल्यानं त्याचा प्रभाव आणखी वाढतो. केसगळती, कमकुवत केसांसाठी हा उपाय नक्की करुन बघा.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : केस गळणं, कमकुवत केस असे त्रास असलेल्यांसाठी एक सोपा आणि प्रभावी घरगुती उपाय. जीवनशैलीतले बदल, प्रदूषण आणि तणाव यांचा केसांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होतो. अशा परिस्थितीत, नैसर्गिक उपाय सर्वात सुरक्षित आणि प्रभावी मानले जातात.
News18
News18
advertisement

कोरफड हे केसांसाठी वरदान आहे आणि त्यात इतर काही गोष्टी मिसळल्यानं त्याचा प्रभाव आणखी वाढतो. केसगळती, कमकुवत केसांसाठी हा उपाय नक्की करुन बघा. केस लांब आणि मजबूत होण्यासाठी हा सर्वात प्रभावी घरगुती उपाय आहे.

Cucumber Juice : उन्हाळ्याचा कडाका वाढतोय, तब्येतीला जपा, काकडीचा ज्यूस प्या

advertisement

केसांसाठी कोरफडीचे फायदे

टाळूच्या समस्या: कोरफड केसांच्या मुळांना खोलवर पोषण देते, तसंच टाळूच्या समस्या कमी करण्यासाठी कोरफडीचा वापर होतो.

केस गळणं: कोरफडीमुळे केसांची मुळं मजबूत होतात, आणि केस गळती कमी होते.

कोंडा : कोरफडीमुळे टाळू हायड्रेटेड राहतो, कोरडेपणा नसल्यामुळे कोंड्याचं प्रमाण कमी होतं.

केसांची वाढ: कोरफडीतील प्रोटीओलाइटिक एन्झाईम केसांना नवीन ऊर्जा देतात, ज्यामुळे केसांची वाढ चांगली होते.

advertisement

टाळूला थंडावा : कोरफडीमुळे मिळालेल्या आर्द्रतेमुळे टाळूवरची खाज कमी होते.

कोरफडीसोबत हे मिश्रण ठरतं प्रभावी

1.कोरफड आणि खोबरेल तेल

2 चमचे कोरफड गर, 1 चमचा खोबरेल तेल चांगलं मिसळा आणि केसांच्या मुळांवर लावा. हे मिश्रण 30 मिनिटं ठेवा आणि नंतर कोमट पाण्यानं धुवा. हे मिश्रण केसांना खोलवर पोषण देतं आणि त्यामुळे आर्द्रता राखली जाते,

advertisement

Mosquito Repellent : डासांना वैतागलात ? हे उपाय नक्की करा, घरीच बनवा मॉस्किटो रिपेलेंट

2.कोरफड आणि कांद्याचा रस

दोन चमचे कोरफडीच्या जेलमध्ये, २ चमचे कांद्याचा रस मिसळा आणि टाळूवर लावा आणि 20-25 मिनिटांनी शॅम्पूनं केस धुवा. कांद्याचा रस केसांच्या वाढीसाठी, केस दाट होण्यास मदत करतो.

3. कोरफड आणि आवळा पावडर

advertisement

दोन टीस्पून कोरफड गर, 1 टीस्पून आवळा पावडरची पेस्ट बनवून टाळूवर लावा. 30 मिनिटं ठेवल्यानंतर स्वच्छ धुवा. आवळा पावडरमुळे केसांना चमक आणि ताकद मिळते.

कोरफडीच्या वापरासाठी टिप्स -

आठवड्यातून किमान 2-3 वेळा हा उपाय करा. नेहमी कोरफड गर ताजा वापरा.

हे मिश्रण केसांच्या मुळांमध्ये हलक्या हातानं मसाज करा.

कोरफड आणि त्याच्यासोबत वापरलेले इतर घटक पूर्णपणे नैसर्गिक आणि प्रभावी मानले जातात. त्यांच्या नियमित वापरानं केस लांब आणि मजबूत होण्यास मदत होईल.

मराठी बातम्या/लाइफस्टाईल/हेल्थ/
Hair Care Tips : कोरफड, कांद्याचा रस, नारळाचं तेल, आवळा पावडर करेल केसांवर जादू, नक्की वापरुन बघा
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल