कोरफडीचा गर साठवण्यासाठी आणि त्याचा ताजेपणा टिकून राहण्यासाठी काही महत्त्वाच्या टिप्स. कोरफड
जेलचे त्वचेला अनेक फायदे आहेत. त्वचा आणि केसांसाठी याचा मोठ्या प्रमाणात वापर होतो. कोरफडीत दाहक गुणधर्म भरपूर असतात. हा गर चेहऱ्यावर लावल्यानं त्वचेला पुरेशी आर्द्रता मिळते, सनबर्नची समस्या कमी करता येते, आणि त्वचेला थंडावा मिळतो. मुरुमांचं प्रमाण कमी करण्यासाठीही कोरफड फायदेशीर आहे. केसांवर कोरफड लावल्यास टाळूला पुरेसा ओलावा मिळतो, केस मऊ होतात आणि कोंडा कमी होण्यासही मदत होते.
advertisement
Proteins : प्रथिनांसाठी फक्त अंडी हाच पर्याय नाही, हे शाकाहारी पदार्थही लक्षात ठेवा
अनेकांच्या घरात कोरफड लावलेली असते. पण, या पानांमधून गर काढला तर ते एक ते दीड दिवसांत खराब होतो आणि कोरफड वाया जाते.
कोरफडीचा गर साठवण्यासाठी काही टिप्स -
कोरफडीचा गर साठवण्याची पहिली अट म्हणजे गर थंड ठिकाणी ठेवावा. कोरफड फ्रिजमध्ये ठेवल्यास ते जास्त काळ खराब होणार नाही आणि किमान आठवडाभर वापरण्यासाठी योग्य राहील.
कोरफड वेरा जेल साठवण्यासाठी हवाबंद कंटेनर वापरा.
स्क्रू असलेला जार वापरल्यानं बाहेरची हवा आत जाणार नाही.
कोरफड गर ठेवलेली बाटली किंवा जार सूर्यप्रकाशापासून दूर ठेवा. कोरफड गर ज्या बाटली किंवा जारमध्ये भरणार तेव्हा ते आधी पूर्णपणे स्वच्छ करा. कोरफडीचं पान कापून बर्फाच्या पाण्यात ठेवा.
जेल न बनवता हा लगदा पानातून जसा आहे तसा बाहेर काढता येतो आणि कधीही वापरता येतो.
Walking : वयानुसार ठरवा चालण्याचं गणित, रोज चाला, वजन नियंत्रणात ठेवा
घरच्या घरी कोरफड जेल कसं बनवावं ?
कोरफडीचं जेल बनवण्यासाठी कोरफडीचं ताजं पान कापून घ्या.
पानाचा हिरवा भाग कापून पांढरा जेल वेगळा करा.
हा पांढरा लगदा मिक्सरमध्ये टाकून एकदा फिरवा.
त्यात थोडं गुलाबपाणी मिसळा आणि डब्यात ठेवा. घरगुती कोरफडीचं जेल तयार आहे.
