हवामान बदल आणि मानसिक आरोग्याचा संबंध काय?
हवामानाचा मानवी मेंदूवर थेट परिणाम होतो. ढगाळ वातावरण किंवा सतत सूर्यप्रकाशाचा अभाव असल्यास मेंदूमधील सेरोटोनिन या आनंददायी हार्मोनची पातळी कमी होते. परिणामी व्यक्तीचा मूड खराब होतो, निरुत्साही वाटते. तर थंडीच्या काळात अनेकांना आळस, झोपेचा त्रास आणि नैराश्याची लक्षणे दिसून येतात.
advertisement
शारीरिक त्रासाबरोबर मानसिक लक्षणेही दिसून येतात. हवामान बदलामुळे सर्दी, खोकला, ताप, सांधेदुखी यांसारखे आजार वाढतात. मात्र याच काळात चिंता, अस्वस्थता, एकाग्रतेचा अभाव, चिडचिडेपणा अशा मानसिक तक्रारीही वाढतात. विशेषतः विद्यार्थी, वृद्ध, दीर्घ आजार असलेले रुग्ण आणि कामाच्या तणावाखालील व्यक्तींना याचा अधिक त्रास होतो.
हवामानातील बदलात मानसिक आरोग्याची कशी घ्यावी काळजी?
मानसिक आरोग्य राखण्यासाठी नियमित सूर्यप्रकाशात थोडा वेळ घालवणे, सकस आणि संतुलित आहार घेणे, पुरेशी झोप घेणे, हलका व्यायाम, योग किंवा ध्यान करणे, मोबाईल आणि स्क्रीन टाइम कमी ठेवणे, तणाव जाणवत असल्यास कुटुंबीयांशी किंवा मित्रांशी संवाद साधणे, या गोष्टी केल्यास मानसिक आरोग्य राखण्यासाठी मदत होते.
मानसिक आरोग्याकडे दुर्लक्ष केल्यास त्याचा थेट परिणाम दैनंदिन कामकाजावर होऊ शकतो. त्यामुळे सतत उदासीनता, अस्वस्थता किंवा झोपेचा त्रास जाणवत असल्यास तज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.





