हर्षदा कबाडे या योगा इंस्ट्रक्टर म्हणून काम करतात. त्या मूळच्या कर्नाटकातील गोकाक येथील आहेत. तर हर्षदा यांचे पती एका सॉफ्टवेअर कंपनीमध्ये नोकरी करत असून पतीच्या नोकरीच्या कारणास्तव त्यांना कोल्हापूरला यावे लागले होते. सध्या त्या कोल्हापूरमध्ये स्थायिक आहेत. त्यांना एक मुलगा असून तो अकरावीत शिकत आहे.
का देण्यात येणार पुरस्कार ?
advertisement
महाराष्ट्र एक्सलेंस अवॉर्ड 2023 हा पुरस्कार हर्षदा यांना खरंतर त्यांच्या योगा क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरीबद्दल जाहीर झाला आहे. पूर्णपणे कन्नड भाषिक असून सुद्धा कोल्हापुरात स्थायिक झाल्यानंतर मराठीतून योगाचे अधिकृत शिक्षण त्यांनी घेतले. त्यानंतर पुढे त्या योगाचे महत्त्व लोकांना पटवून देत आहेत. सध्या त्या एक प्रायव्हेट जिम ट्रेनर म्हणून काम करतात. तर एका फिटनेस सेंटरमध्ये काम करत त्या स्वतःही योगा क्लास घेतात. हे करत असतानाच त्यांनी स्वतःचं योगा क्षेत्रातील यूट्यूब चॅनलही काढले आहे. याद्वारे त्या मराठीतून योगाचे महत्त्व सर्वांना समजावून सांगत असतात. ह्युमन राईट मिरर या संस्थेने त्यांच्या याच कार्याची दखल घेऊन यंदाचा महाराष्ट्र एक्सलेंस पुरस्कारासाठी त्यांच्या नावाची घोषणा केलीय.
वेटर ते ‘सिंधूताई....’ मालिका! कोल्हापूरच्या अमितचा ‘लय भारी’ प्रवास माहिती आहे?
शिक्षण कन्नड आणि योगशिक्षण मराठीत
हर्षदा यांना योगाची आवड लागली आणि त्यांनी योगाचे शिक्षण घ्यायचे ठरवले. मग एमए योगा, सायन्स अँड डीप इन् योगा अशी पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. खरंतर संपूर्ण पदवीपर्यंतचे शिक्षण कन्नड भाषेत पूर्ण करुन देखील नंतर योगाचे पदव्युत्तर शिक्षण त्यांनी मराठी भाषेतून घेतले. ही त्यांची एक विशेष बाब आहे.
हर्षदा यांना अशी लागली योगाची आवड
खरंतर कर्नाटकातून कोल्हापुरात आल्यानंतर काही कारणास्तव हर्षदा या स्वतः डिप्रेशन मध्ये गेल्या होत्या. त्या परिस्थतीतून बाहेर पडण्यासाठी त्यांनी योगाचे शिक्षण घेण्याचे ठरवले होते. यावेळी त्यांनी स्वतःला योगाच्या मदतीने डिप्रेशन मधून बाहेर काढले. तेव्हाच त्यांना योगाचे महत्व समजले होते. त्यावेळी इतरांच्या आयुष्यातील समस्या कमी करण्यासाठी आपण योगाची मदत घेऊ शकतो, हेही त्यांच्या लक्षात आले. म्हणूनच तेव्हापासून त्यांनी योगाच्या माध्यमातून काम करण्याचे ठरवले.
कोल्हापूरकरांनी गाजवलं कर्नाटक, चित्तथरारक मोटार स्पर्धेत रचला इतिहास
असा होणार पुरस्कार वितरण कार्यक्रम
काहीच दिवसात नवी मुंबईत होणारा ह्यूमन राईट मिरर प्रस्तुत महाराष्ट्र एक्सलेंस अवॉर्ड २०२३ हा हर्षदा यांना दिला जाणार आहे. बॉलीवूडच्या सुप्रसिद्ध अभिनेत्री अमिषा पटेल यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. या सोहळ्यास बॉलिवूड अभिनेत्री पूनम कपूर यांची देखील प्रमुख उपस्थिती असेल.
दरम्यान, योग क्षेत्रातील हर्षदा यांचा पहिलाच पुरस्कार असल्यामुळे त्यांनीही आनंद व्यक्त केला आहे. तर मित्रपरिवार आणि नातेवाईकांकडून हर्षदा यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होतोय.