टेलिफोबिया म्हणजे काय?
फोन कॉल करण्याची किंवा येणारा कॉल उचलण्याची तीव्र भीती म्हणजे टेलिफोबिया. ही समस्या मुख्यतः सामाजिक भीती किंवा आत्मविश्वासाच्या कमतरतेशी संबंधित असते. विशेषतः तरुणांमध्ये आणि ऑफिसमध्ये काम करणाऱ्या व्यक्तींमध्ये ही समस्या वाढताना दिसत आहे.
सावधान! सोशल मीडियावरील 'ती' पोस्ट पडली महागात; तिघांची थेट येरवडा कारागृहात रवानगी
टेलिफोबियाची प्रमुख लक्षणे कोणती?
advertisement
फोन वाजताच घाबरल्यासारखे वाटणे. कॉल करण्याऐवजी मेसेज किंवा व्हॉट्सॲपचा जास्त वापर करणे. फोन कॉल टाळण्यासाठी कारणे शोधणे. कॉल करण्यापूर्वी घाम येणे, हृदयाची धडधड वाढणे. कॉल झाल्यानंतर सतत विचार करत राहणे. ऑफिस कॉल्समुळे ताणतणाव वाढणे, ही प्रमुख लक्षणे आहेत.
टेलिफोबिया का होतो?
तज्ज्ञांच्या मते, टेलिफोबियामागे अनेक कारणे असू शकतात. भूतकाळातील वाईट अनुभव, चुकीचं बोलण्याची किंवा अपमान होण्याची भीती, आत्मविश्वासाचा अभाव, सतत मेसेजिंगवर अवलंबून राहण्याची सवय, परफेक्शनची अपेक्षा या कारणांमुळे टेलिफोबिया होऊ शकतो.
टेलिफोबियावर नियंत्रण कसं मिळवावं?
टेलिफोबिया ही समस्या योग्य उपायांनी नियंत्रणात आणता येऊ शकते. हळूहळू फोन कॉल्सची सवय लावणे. आधी ओळखीच्या व्यक्तींना कॉल करून बोलणे. काय बोलायचं आहे याची साधी रूपरेषा तयार करून ठेवणे. स्वतःशी सकारात्मक संवाद ठेवणे. दीर्घ श्वसन व रिलॅक्सेशन तंत्र वापरणे. डिजिटल डिटॉक्स करणे. मेसेजिंगवरचा अति अवलंब कमी करणे. समस्या तीव्र असल्यास तज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.
तज्ज्ञ काय सांगतात?
टेलिफोबिया ही दुर्लक्षित केली जाणारी मानसिक समस्या आहे. वेळेवर लक्ष दिल्यास ती पूर्णपणे बरी होऊ शकते, असे तज्ज्ञ सांगतात. फोनची भीती ही कमकुवतपणाचं लक्षण नसून मानसिक आरोग्याशी संबंधित बाब आहे. संवाद कौशल्य वाढवून आणि योग्य मार्गदर्शन घेतल्यास टेलिफोबियावर नक्कीच मात करता येऊ शकते.





