TRENDING:

Monsoon Diseases : पावसाळ्यातल्या या पाहुण्यांचं करु नका स्वागत, साथीच्या रोगांपासून राहा सावध

Last Updated:

पावसाळा आवडत असला तरी आपल्यासोबत तो अनेक आजारही घेऊन येतो, त्यांना वेळीच रोखलं नाहीत तर ते गंभीर रूप धारण करू शकतात. या ऋतूमध्ये आर्द्रता आणि घाणीमुळे अनेक प्रकारचे संसर्ग होतात.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : पावसाळा आवडण्याचं कारण म्हणजे कडक उन्हापासून आराम मिळतो. मृदगंध पसरायला सुरुवात होते, झाडं - पानं टवटवीत दिसतात. पण, पावसाळा आपल्यासोबत अनेक आजारही घेऊन येतो, त्यांना वेळीच रोखलं नाहीत तर ते गंभीर रूप धारण करू शकतात. या ऋतूमध्ये आर्द्रता आणि घाणीमुळे अनेक प्रकारचे संसर्ग होतात.
News18
News18
advertisement

मान्सूनमधे होणारे सामान्य आजार -

1. कावीळ

अस्वच्छ पाणी प्यायल्यानं यकृतावर परिणाम होतो. त्याचा परिणाम डोळ्यांच्या रंगात आणि लघवीत दिसून येतो. भूक कमी लागते आणि शरीर थकल्यासारखं वाटतं.

2. अतिसार

दूषित अन्न किंवा दूषित पाण्यामुळे पोट बिघडतं. वारंवार सैल मल आणि निर्जलीकरण ही त्याची लक्षणं आहेत.

3. टायफॉइड

दीर्घकाळ ताप, डोकेदुखी, पोटदुखी आणि अशक्तपणा ही त्याची लक्षणं असू शकतात. दूषित अन्न आणि पाणी हे याचं मुख्य कारण आहे.

advertisement

Dehydration : पुरेसं पाणी न पिण्याचे शरीरावर परिणाम, या संकेतांकडे लक्ष द्या

4. सर्दी आणि विषाणूजन्य ताप

दमट वातावरणात विषाणू सहज पसरतात. घसा खवखवणं, ताप येणं, नाकातून पाणी येणं आणि शरीरदुखी ही त्याची लक्षणं आहेत.

5. मलेरिया आणि डेंग्यू

साचलेल्या पाण्यामुळे डासांची उत्पत्ती होते. डास चावल्यानं खूप ताप येतो, शरीरात वेदना जाणवतात. डेंग्यूमध्ये प्लेटलेट्सची संख्या कमी होऊ शकते आणि खूप अशक्तपणा जाणवतो.

advertisement

6. लेप्टोस्पायरोसिस

हा संसर्ग अस्वच्छ पाण्यात चालल्यानं होतो, पाय दुखतात, ताप आणि स्नायूंमध्ये वेदना जाणवतात.

7. त्वचेचा संसर्ग

ओलावा आणि घाणीमुळे बुरशीजन्य संसर्ग होतो. विशेषतः काख, कंबर आणि पायाच्या बोटांमध्ये खाज येते आणि जळजळ होते.

Hair Care : पावसाळ्यासाठी बनवा नैसर्गिक हेअर मास्क, कोरडे - कडक केस होतील मऊ

advertisement

हंगामी आजारांपासून बचाव करणं शक्य आहे, यासाठी काही बाबींकडे नक्की लक्ष द्या -

- बाहेरचं अन्न खाणं टाळा आणि फक्त ताजं घरी शिजवलेलं अन्न खा.

- स्वच्छ आणि उकळलेलं पाणी प्या.

- जेवण्यापूर्वी हात धुवा.

- डासांपासून स्वतःचं रक्षण करण्यासाठी, क्रीम, जाळी आणि डास प्रतिबंधक औषधांचा वापरा करा.

- अस्वच्छ पाण्यात चालणं टाळा.

advertisement

- दररोज आंघोळ करा आणि ओले कपडे वापरु नका.

- आहारात फळं आणि हिरव्या भाज्यांचा समावेश करा.

- सर्दी किंवा ताप असल्यास स्वतःहून उपचार करू नका; डॉक्टरांचा सल्ला घ्या.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
आले दरात चढ-उतार, केळी आणि तिळाला काय मिळाला शुक्रवारी भाव? Video
सर्व पहा

- आजाराकडे दुर्लक्ष करू नका, वेळेवर उपचार घ्या आणि खबरदारी घ्या.

मराठी बातम्या/लाइफस्टाईल/हेल्थ/
Monsoon Diseases : पावसाळ्यातल्या या पाहुण्यांचं करु नका स्वागत, साथीच्या रोगांपासून राहा सावध
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल