रांची : नखे हा शरीराचा एक अतिशय महत्त्वाचा भाग आहेत. नखे पाहूनच तुम्हाला तुमच्या आरोग्याविषयी अनेक गोष्टी कळू शकतात. तसेच तुम्ही घरी बसून त्याबाबत उपचारही करू शकता. झारखंडचे सुप्रसिद्ध आयुर्वेदिक डॉक्टर व्ही. के. पांडे यांनी याबाबत माहिती दिली. यावेळी त्यांनी सांगितले की, तुम्ही तुमची नखे पाहून तुमच्या आरोग्याविषयी बरेच काही जाणून घेऊ शकता आणि त्यावर घरी उपाय देखील करू शकता.
advertisement
डॉ. वी. के. पांडे यांनी लोकल18 शी बोलताना सांगितेल की, लोक अनेकदा नखांना हलक्यात घेतात. पण तो शरीराचा एक अतिशय महत्त्वाचा भाग आहे. तुमच्या शरीरात कोणत्या आवश्यक जीवनसत्त्वांची कमतरता आहे किंवा तुमच्या शरीरातील हिमोग्लोबिनची पातळी काय असू शकते, हे नखे पाहून तुम्ही सांगू शकता. फक्त यासाठी तुम्हाला फक्त तुमच्या नखांकडे लक्ष देणे आणि त्यांना समजून घेणे आवश्यक आहे.
अशाप्रकारे जाणून घ्या -
डॉ. वी. के. पांडे यांनी सांगितले की, जर तुमची नखे खूप पिवळी झाली असतील तर तुम्हाला समजले पाहिजे की, तुमच्या शरीरात व्हिटॅमिन बी 12 आणि बी 16 ची गंभीर कमतरता आहे. अशा स्थितीत तुम्ही फॉरेन प्रोटीन युक्त अन्नाचे सेवन करावे. जसे की हिरवा मूग, पालक, दूध, पनीर आणि सोया या सर्व पदार्थांचे सेवन करू शकता. यामुळे या जीवनसत्त्वांची कमतरता पूर्ण होईल. तसेच जर तुमचे नखे काळे झाले असतील तर समजून घ्या तुमच्या किडनीमध्ये समस्या आहे.
नखे काळी झाली आहेत याचा अर्थ असा की, किडनी स्टोन, किडनी निकामी होणे किंवा किडनी त्यांच्या उच्च पातळीवर काम करू शकत नाहीत. जर नखे खूप पांढरे दिसत असतील तर शरीरात हिमोग्लोबिनची तीव्र कमतरता असते. अशा परिस्थितीत तुम्ही बीटरूट, डाळिंबाचा रस, पालक, दूध, पपई, किवी आणि फळांचे रस सेवन करावे.
जर तुमची नखे वारंवार तुटत असतील तर ते तुमची रोगप्रतिकार शक्ती कमकुवत आहे, असे ते सूचित करते. अशा परिस्थितीत तुम्ही घरीच संतुलित आहार घेऊन तुमचे आरोग्य सुधारू शकता. तुमच्या अन्नामध्ये प्रथिने, कर्बोदके, चांगली चरबी, पोषक तत्वे, जीवनसत्त्वे आणि ग्लुकोज समान प्रमाणात असले पाहिजेत. जर तुम्ही चांगला आहार घेतला तर व्यायाम करा. त्यामुळे तुमचे आरोग्य दीर्घकाळ चांगले राहील, असा महत्त्वाचा सल्लाही त्यांनी दिला.
(सूचना - ही बातमी आयुर्वेदिक डॉक्टर यांच्या झालेल्या संवादानंतर लिहिली गेली आहे. याबाबत लोकल18 कोणताही दावा करत नाही)
