TRENDING:

Mango Juice : आंब्याचा रस करताना दुधाचा वापर करताय? चांगलं की वाईट? Video

Last Updated:

काहीजण आंब्याचा रस करताना त्यामध्ये दुधाचा वापर हा करतात. पण आंब्याचा रस करताना दुधाचा वापर करावा किंवा करू नये? याविषयीचं आपल्याला आहार तज्ज्ञ जया गावंडे यांनी माहिती दिली आहे. 

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
छत्रपती संभाजीनगर : लहानांपासून मोठ्यांपर्यंत आंबे खायला सर्वांनाच आवडतात. तसंच आंब्याचा रस खायला देखील खूप आवडतो. पण काहीजण आंब्याचा रस करताना त्यामध्ये दुधाचा वापर हा करतात. पण आंब्याचा रस करताना दुधाचा वापर करावा किंवा करू नये? याविषयीचं आपल्याला आहार तज्ज्ञ जया गावंडे यांनी माहिती दिली आहे.
advertisement

कुठले फळ जर तुम्हाला खायचं असेल तर ते फळ नुसतं खावं. त्यामध्ये दुधाचा वापर हा करू नये. आंबा हा थोडासा आंबट असतो आणि दुधात जर टाकला तर ते दूध नासतंत्यामुळे आंब्याचा रस करताना त्यामध्ये दुधाचा वापर नाही केला तर ते चांगलंच आहे, असं आहार तज्ज्ञ जया गावंडे सांगतात.

advertisement

उन्हाळ्यात जनावरांची काळजी कशी घ्यावी? पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिल्या 'या' महत्त्वाच्या टिप्स!

जर तुम्हाला आंब्याच्या रसामध्ये दूध आवडत असेल तर तुम्ही थोड्या प्रमाणात दुधाचा वापर करू शकता. जर तुम्हाला आंब्याच्या रसामध्ये दूध टाकायचं असेल तर त्यासाठी तुम्ही एकदम गोड असा आंबा घ्यावा त्यामध्ये थोडाही आंबटपणा नसावाएकदम गोड आंबा जर घेतला आणि त्यामध्ये जर तुम्ही थोड्या प्रमाणात दूध घातलं तर ते चालतंत्याचा परिणाम हा जास्त होत नाही, असं आहार तज्ज्ञ जया गावंडे सांगतात.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
महाशिवरात्रीला शंकराच्या पिंडीवर चुकूनही अशा वस्तू टाकू नका, संपूर्ण माहिती, Vid
सर्व पहा

तसंच ज्यांना मधुमेह आहे किंवा हृदयविकार आहे अशांनी तर आंब्याचा रस हा बिना दूध न घालता घ्यावा. नुसताच तुम्ही आंब्याचा रस हा घेऊ शकता किंवा नुसते आंबे तुम्ही खाऊ शकता. त्यामुळे जर तुम्हाला आंब्याचा रस खायचा असेल तर तो तुम्ही शक्यतो बिना दूध घालताच खावाम्हणजेच की त्याचा कुठलाही परिणाम हा तुमच्या शरिरावर होणार नाही, असंही आहार तज्ज्ञ जया गावंडे यांनी सांगितलं.

advertisement

मराठी बातम्या/लाइफस्टाईल/हेल्थ/
Mango Juice : आंब्याचा रस करताना दुधाचा वापर करताय? चांगलं की वाईट? Video
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल