आयुर्वेदानुसार, ताण ही केवळ मानसिक स्थिती नाही तर ती शरीरातील वात दोषाच्या असंतुलन होण्याचं लक्षण आहे. वात दोष असंतुलित होतो तेव्हा काय होतं - अनेक आयुर्वेदिक ग्रंथांत याचा उल्लेख आहे. चरक आणि सुश्रुत संहितेत त्याची व्याख्या आहे. वात दोष हा वायु तत्वाशी संबंधित आहे आणि यामुळे शरीरातील हालचाल, रक्ताभिसरण आणि मज्जासंस्था नियंत्रित होते. हा दोष असंतुलित असतो तेव्हा व्यक्तीला मानसिक अस्थिरता, अस्वस्थता, निद्रानाश आणि शारीरिक जडपणा यासारखी लक्षणं जाणवतात.
advertisement
Eye Care : डिजिटल जगात घ्या डोळ्यांची काळजी, या रंगांची फळं - भाज्या खाणं फायदेशीर
शरीरातील हे असंतुलन आधी स्नायू आणि अस्थिबंधनांवर परिणाम करतं, ज्यामुळे व्यक्तीला मान, पाठ किंवा खांद्यावर दाब जाणवतो. सकाळी शरीरात जडपणा, थकवा आणि झोपेच्या वेळी दात एकमेकांवर घासण्याची सवय ही याची लक्षणं असू शकतात.
वात वाढल्यानं देखील ताण येतो. ताण येण्याची मुख्य कारणं म्हणजे वाताचं वाढलेलं प्रमाण आणि शरीरातून विषारी आणि अनावश्यक पदार्थ वेळेवर बाहेर न पडणं.
Oral Hygiene : दात, हिरड्या दुखतायत ? आयुर्वेदिक उपाय ठरेल परिणामकारक
एखादी व्यक्ती सतत मानसिक दबावाखाली असते आणि आपले विचार कोणाशीही शेअर करत नाही, तेव्हा या भावना शरीरात खोलवर बसतात आणि तणावाचं रूप धारण करतात. याचा परिणाम हळूहळू मज्जासंस्थेवर होतो, ज्यामुळे शारीरिक ताणाची लक्षणं दिसू लागतात.
वात संतुलित करण्याचं महत्त्व -
आयुर्वेदिक उपचारांमध्ये, सर्वात प्रथम वात संतुलित करण्याची प्रक्रिया केली जाते. यासाठी नियमित जीवनशैली, गरम जेवम, पुरेशी विश्रांती आणि मालिश करणं महत्वाचं आहे. तेल मालिशमुळे शरीरातील वात शांत होतो आणि स्नायूंना लवचिकता मिळते.
योग आणि प्राणायाम हे देखील आयुर्वेदाचा एक महत्त्वाचा भाग मानले जातात, मन आणि शरीर यांच्यात संतुलनासाठी योग आवश्यक आहे. विशेषतः अनुलोम-विलोम आणि श्वासोच्छवासावर नियंत्रण यामुळे वात दोष संतुलित होतो आणि मनाला शांतता मिळते.