Oral Hygiene : दात, हिरड्या दुखतायत ? आयुर्वेदिक उपाय ठरेल परिणामकारक

Last Updated:

दिवसातून दोनदा दात घासले तरीही त्यांना पायरिया, हिरड्यांमधून रक्त येणं किंवा तोंडाची दुर्गंधी यासारख्या समस्यांचा त्रास होतो. बहुतेक टूथपेस्टमधे असलेली SLS (सोडियम लॉरिल सल्फेट) आणि फ्लोराईडसारखी रसायनं दातांना फायदा होण्याऐवजी अधिक नुकसान करू शकतात. यावर एक आयुर्वेदिक उपाय आहे.

News18
News18
मुंबई : दात दुखणं, किडणं, हिरड्या दुखणं, हिरड्यांमधून रक्त येणं अशा दाताशी संबंधित अनेक समस्या आहेत. पण बहुतेकदा याकडे दुर्लक्ष केलं जातं. पायरोरिया, मुख दुर्गंधी, या सर्व समस्यांमुळे मौखिक आरोग्य बिघडतं.
दिवसातून दोनदा दात घासले तरीही त्यांना पायरिया, हिरड्यांमधून रक्त येणं किंवा तोंडाची दुर्गंधी यासारख्या समस्यांचा त्रास होतो. बहुतेक टूथपेस्टमधे असलेली SLS (सोडियम लॉरिल सल्फेट) आणि फ्लोराईडसारखी रसायनं दातांना फायदा होण्याऐवजी अधिक नुकसान करू शकतात. यावर एक आयुर्वेदिक उपाय आहे.
advertisement
आयुर्वेदात दात आणि हिरड्या स्वच्छ करण्यासाठी अनेक सुरक्षित आणि नैसर्गिक पद्धतींचं वर्णन केलं आहे, यामुळे कोणतीही हानी होत नाही. यासाठी लागणारं साहित्य -
दहा ग्रॅम लवंगा
वीस ग्रॅम हळद
तीस ग्रॅम तमालपत्र आणि
चाळीस ग्रॅम खडे मीठ
advertisement
हे चारही जिन्नस एकत्र करा आणि बारीक करा आणि तयार पावडर हवाबंद डब्यात ठेवा. दररोज सकाळी आणि संध्याकाळी अर्धा चमचा पावडरमधे थोडंसं मोहरीचं तेल मिसळून दात घासण्याचा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे.
- लवंगांमधील जंतूनाशक आणि वेदनाशामक गुणधर्मांमुळे दातदुखी आणि संसर्ग कमी होतो.
advertisement
- हळदीत नैसर्गिक जीवाणू वाढीला प्रतिबंध करणारा पदार्थ आणि दाहक-विरोधी गुणधर्म असतात, जे सुजलेल्या हिरड्या आणि पायरियावर उपचार करण्यासाठी प्रभावी आहेत.
- तमालपत्रामुळे तोंडाची दुर्गंधी दूर होते आणि विषाणू मरतात.
- सैंधव मीठामुळे दातांवरील पिवळेपणा दूर होण्यासाठी आणि हिरड्या मजबूत होतात.
ही आयुर्वेदिक रेसिपी पूर्णपणे नैसर्गिक आहे, त्यात कोणत्याही हानिकारक रसायनांचा वापर नाही.
advertisement
view comments
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/हेल्थ/
Oral Hygiene : दात, हिरड्या दुखतायत ? आयुर्वेदिक उपाय ठरेल परिणामकारक
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement