फॅटी लिव्हरचा त्रास होत असेल तेव्हा, यकृत योग्यरित्या कार्य करू शकत नाही ज्यामुळे एखाद्या व्यक्तीला थोडं काम करूनही थकवा जाणवू लागतो, यकृताभोवती वेदना होतात आणि कधीकधी व्यक्तीचं वजन वेगानं वाढतं किंवा कमी होऊ लागतं, जे आरोग्यासाठी चांगलं नाही.
Knee Pain : गुडघेदुखी कमी करण्यासाठी घरी बनवा तेल, आजीच्या बटव्यातलं खास औषध
advertisement
ही समस्या टाळण्यासाठी फॅटी लिव्हर वेळेवर ओळखणं आणि जीवनशैली आणि खाण्याच्या सवयींमधे बदल करणं खूप महत्वाचं आहे. डॉ. सौरभ सेठी यांनी त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे ज्यात त्यांनी फॅटी लिव्हरची लक्षणं घरी कशी ओळखता येतात हे स्पष्ट केलं आहे. यामुळे फॅटी लिव्हर लवकर ओळखता येतं आणि त्यावर उपचार करता येतात.
फॅटी लिव्हरची लक्षणं -
- फॅटी लिव्हर झाल्यावर पोटाच्या मध्यभागी चरबी जमा होऊ लागते. फॅटी लिव्हरशी जोडलेल्या इन्सुलिन रेझिस्टन्समुळे, पोटाचा मधला भाग अनेकदा चरबीयुक्त होऊ लागतो.
- फॅटी लिव्हरमुळे नेहमी थकवा जाणवतो.
- सतत थकवा आणि आळस येणं म्हणजे यकृताच्या कार्यावर परिणाम होत असल्याचे संकेत आहेत असं म्हणता येईल.
- उजव्या बरगड्यांभोवती वेदना होणं हे देखील फॅटी लिव्हरचं लक्षण आहे. यकृतात सूज येत असल्याचं ते लक्षण आहे.
- इन्सुलिन रेझिस्टन्समुळे चेहऱ्यावर मुरुमं येणं, त्वचेचे थर काळे पडणं आणि केस गळणं यासारख्या समस्या उद्भवू शकतात.
- भूक न लागणं आणि मळमळ होणं ही देखील फॅटी लिव्हरची लक्षणं आहेत. याचा अर्थ यकृतावर जास्त दबाव आहे असा होऊ शकतो.
यकृत निरोगी ठेवण्यासाठी काय खाऊ नये -
- यकृताचं आरोग्य चांगलं राखायचं असेल तर फ्रुक्टोजयुक्त साखरयुक्त पेय पिऊ नका.
Fig Water : आरोग्यासाठी हितकारक - अंजीराचं पाणी, शरीरासाठी खूप उपयुक्त
- प्रक्रिया केलेले स्नॅक्स यकृतातील चरबी वाढवतात. म्हणूनच हे प्रक्रिया केलेले स्नॅक्स खाणं टाळावं. हे पदार्थ खाण्याऐवजी, हेल्दी नट्स म्हणजे सुकी फळं आणि बिया हा चांगला पर्याय आहे.
- सोयाबीन, कॉर्न आणि सूर्यफूल तेलांमध्ये ओमेगा-3 फॅटी एसिड भरपूर प्रमाणात असतात. याच प्रमाण जास्त असेल तर यकृतावरची सूज आणि ऑक्सिडेटिव्ह ताण वाढू शकतो.
- बाजारात उपलब्ध असलेल्या फळांच्या रसांमध्येही फ्रुक्टोजचं प्रमाण जास्त असतं आणि त्यात फायबरचं प्रमाण कमी असतं. फळांचे रस प्यायल्यानं रक्तातील साखरेची पातळी झपाट्यानं वाढू शकते. रक्तातली साखर वाढली तर फॅटी लिव्हरची समस्या वाढते.