TRENDING:

Uric Acid: युरिक ॲसिड नियंत्रित करण्यासाठी वापरा हे पदार्थ, कोथिंबीर - पुदिना चटणीचा होईल उपयोग

Last Updated:

Uric Acid Control Tips: युरिक ॲसिड वाढलं तर उपचार करण्याबरोबरच आहारातही काही बदल केल्यानं त्याचे परिणाम कमी जाणवतील. युरिक ॲसिड कमी करण्यासाठी दोन चटण्या हे प्रमाण कमी करण्यासाठी उपयुक्त ठरतील.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई: युरिक ॲसिड वाढलं तर उपचार करण्याबरोबरच आहारातही काही बदल केल्यानं त्याचे परिणाम कमी जाणवतील. युरिक ॲसिड कमी करण्यासाठी दोन चटण्या हे प्रमाण कमी करण्यासाठी उपयुक्त ठरतील.
News18
News18
advertisement

युरिक ॲसिडच्या समस्येचं प्रमाण खूप वाढलं आहे. याचं एक प्रमुख कारण म्हणजे खराब जीवनशैली आणि खाण्याच्या सवयी. युरिक ॲसिड हा आपल्या शरीरातील एक टाकाऊ पदार्थ आहे. अन्न आणि पेयांच्या पचनानंतर प्युरिन नावाच्या रसायनांच्या विघटनानंतर हे तयार होतं. सामान्यतः, बहुतांश युरिक ॲसिड आपल्या रक्तात विरघळतं, मूत्रपिंडांमधून जातं आणि मूत्रामार्गे शरीरातून बाहेर टाकलं जातं.

advertisement

परंतु जेव्हा शरीरात यूरिक ॲसिडचं प्रमाण खूप जास्त होतं‌तेव्हा त्याला हायपरयुरिसेमिया म्हणतात. शरीरात याचं जास्त प्रमाण अनेक समस्यांना कारणीभूत ठरू शकतं. जर तुम्हालाही यूरिक ॲसिड नियंत्रित करायचं असेल तर तुम्ही तुमच्या आहारात आरोग्यदायी गोष्टींचा समावेश करू शकता.

Vitamins Deficiency : आरोग्याकडे दुर्लक्ष करु नका, जीवनसत्त्वांची कमतरता ठरेल आजाराचं कारण, महिलांसाठी विशेष सल्ला

advertisement

चटणीची कृती

यूरिक ॲसिड नियंत्रित करण्यासाठी तुम्ही कोथिंबीर, पुदिन्याची पानं, हिरवी मिरची, आलं आणि मीठ मिसळून चटणी तयार करू शकता. हे करण्यासाठी, सर्वप्रथम तुम्हाला कोथिंबीर आणि पुदिन्याची पानं चांगली धुवावी लागतील. नंतर आलं, हिरवी मिरची आणि पानं मिक्सरमध्ये टाकून बारीक करा. चटणी तयार झाल्यावर चवीनुसार मीठ घालून पुन्हा बारीक करून घ्या.

advertisement

Fatty Liver : फॅटी लिव्हरची समस्या टाळण्यासाठी उपाय, या सवयी बदला

कोथिंबीरीचे फायदे

कोथिंबीरीच्या पानांमध्ये कॅल्शियम, पोटॅशियम, थायामिन, फॉस्फरस आणि नियासिन सारखे अनेक गुणधर्म आढळतात, ज्यामुळे यूरिक ॲसिड कमी होण्यास मदत होते. ते तुम्ही चटणीत घालून खाऊ शकता.

पुदिन्याच्या पानांचे फायदे

पुदिन्यात अनेक महत्त्वाचे पोषक घटक आढळतात, जे यूरिक ॲसिड कमी करण्यास मदत करतात. त्यात लोह, पोटॅशियम आणि मँगनीजचं प्रमाण चांगलं असतं. पुदिन्याचं सेवन केल्यानं लघवीतील प्युरिन कमी होतं आणि शरीरातील विषारी पदार्थ बाहेर पडतात.

advertisement

युरिक ॲसिड वाढल्यानं वेदना होतात. त्यामुळे वेळेवर वैद्यकीय सल्ला घ्या.

मराठी बातम्या/लाइफस्टाईल/हेल्थ/
Uric Acid: युरिक ॲसिड नियंत्रित करण्यासाठी वापरा हे पदार्थ, कोथिंबीर - पुदिना चटणीचा होईल उपयोग
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल