निरोगी हृदयासाठी हे बदल नक्की करा -
- तुमच्या आहारात फायबरचा समावेश करा. तांदूळ, क्विनोआ, ओट्स आणि बार्ली यासारखे पदार्थ आपल्या आहारात असू द्या.
- फायबर व्यतिरिक्त, बी जीवनसत्त्व, मॅग्नेशियम आणि सेलेनियम सारख्या खनिजांच्या सेवनानं पचन सुधारतं आणि हृदयाला देखील फायदा होतो.
- फायबर रक्तातील साखर आणि कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी देखील प्रभावी आहे.
- भाज्या आणि फळं खाल्ल्यानं तुम्हाला फायदा होईल, फळं आणि भाज्यांमध्ये अँटी-ऑक्सिडंट्स, खनिज, फायबर आणि जीवनसत्त्वं चांगल्या प्रमाणात असतात.
- फळं - भाज्या खाल्ल्यानं हृदयविकार, पक्षाघात आणि इतर आजारांचा धोका कमी होतो.
- पालक सारख्या हिरव्या पालेभाज्यांमध्ये भरपूर प्रमाणात लोह आणि फोलेट असतं.
- लिंबूवर्गीय फळांपासून शरीराला व्हिटॅमिन सी मिळते.
- गाजर, टोमॅटोमध्ये भरपूर प्रमाणात अँटी-ऑक्सिडंट असल्यानं जळजळ आणि ऑक्सिडेटिव्ह तणाव कमी करण्यासाठी उपयोग होतो.
- कमी चरबीयुक्त प्रथिनं खा, स्नायू दुरुस्तीसाठी आणि रोगप्रतिकारक शक्ती सुधारण्यासाठी प्रथिनं प्रभावी आहेत.
- आहारात कमी चरबीयुक्त प्रथिनांचा समावेश केल्यानं हृदयाचं आरोग्य सुधारतं.
- अंडी, चिकन, टोफू, कडधान्यं खा.
- मोनोसॅच्युरेटेड आणि पॉलीसॅच्युरेटेड फॅट्स हृदयाच्या आरोग्यासाठी चांगले असतात.
advertisement
Aloe Vera : उन्हाळ्यात घ्या चेहऱ्याची काळजी, कोरफडीचा गर करेल त्वचेचं संरक्षण
advertisement
advertisement
ऑलिव्ह ऑइल, सुका मेवा, हे चांगल्या फॅट्सचे चांगले स्रोत आहेत.
Soaked Raisins : सकाळी रिकाम्या पोटी प्या भिजवलेल्या बेदाण्यांचं पाणी, प्रकृतीसाठी भरपूर फायदेशीर
- तळलेल्या पदार्थांना दूर ठेवा - ट्रान्स फॅट्स किंवा जास्त सॅच्युरेटेड फॅट्स हृदयाच्या आरोग्यासाठी चांगले नाहीत. तळलेले पदार्थ आणि प्रक्रिया केलेल्या पदार्थांमध्ये ट्रान्स फॅट्स आणि सॅच्युरेटेड फॅट्स असतात.
- रक्तदाब कमी करण्यासाठी मीठ कमी खा. आपल्या जेवणात मीठ असतंच. पण मिठाचं अतिसेवन टाळा.
- जंक फूड आणि प्रोसेस्ड फूडमध्ये मीठ जास्त असतं. जास्त मीठ घालण्याऐवजी लिंबाचा रस आणि लसूण इत्यादींनी अन्नाची चव वाढवता येते.
- मीठ जास्त प्रमाणात खाल्ल्यानं चयापचयाच्या आरोग्यावर परिणाम होतो. यामुळे कोलेस्टेरॉलही वाढू शकतं आणि वजन वाढू शकतं.
- हृदयविकार टाळण्यासाठी वजन कमी करा. लठ्ठपणामुळे अनेक आजारांना आमंत्रण मिळतं.
advertisement
हृदयाचे आरोग्य राखण्यासाठी ट्रान्स फॅट्सपासून दूर राहणं आवश्यक आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
February 26, 2025 5:45 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/हेल्थ/
Heart Care : हृदय निरोगी ठेवण्यासाठी लक्षात ठेवा या गोष्टी, जीवनशैलीतले बदल ठरतील उपयोगी