केस गळणं, केस पांढरे होणं, केसांत कोंडा होणं अशा अनेक समस्या असतात. यासाठी विविध उपाय आहेतही. तसंच निसर्गोपचार तज्ज्ञांचा सल्ला घेणं देखील तुमच्यासाठी अधिक फायदेशीर ठरू शकतं. निसर्गोपचारतज्ज्ञ डॉ. मनोज दास यांनी त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंटवर यासंदर्भातला खास घरगुती उपाय शेअर केला आहे.
त्यांच्या मते, तांदळाच्या पाण्यात स्वयंपाकघरातील काही घटक मिसळून स्प्रे तयार केला तर ते केसांची वाढ चार पट वेगानं होण्यास मदत होते.
advertisement
Blood Donation : जागतिक रक्तदाता दिवस, मासिक पाळी दरम्यान रक्तदान करता येतं का ?
केसांच्या वाढीसाठी घरगुती उपाय
डॉ. मनोज दास यांच्या मते, तांदळाचं पाणी केसांसाठी खूप फायदेशीर आहे. त्यापासून बनवलेल्या रेसिपीमुळे केस चार पट वेगानं वाढू शकतात. यासाठी शंभर ग्रॅम तांदूळ अर्धा लीटर पाण्यात भिजवावे लागतील.
तांदूळ सुमारे तीन तास पाण्यात भिजत ठेवा. त्यानंतर हे पाणी दहा ते पंधरा मिनिटं गरम करण्यासाठी ठेवा. आच मंद ठेवा, जेणेकरून तांदळाचे गुणधर्म पाण्यात जातील.
Eyesight : डोळ्यांसाठी पौष्टीक आहार, नैसर्गिक घटकांनी वाढेल डोळ्यांची ताकद
यानंतर, तांदूळ गाळून घ्या आणि तयार तांदळाचं पाणी बाजूला ठेवा. या तांदळाच्या पाण्यात ग्लिसरीन आणि कडुनिंबाचा रस घाला आणि चांगलं मिसळा. हे मिश्रण एका स्प्रे बाटलीत भरून ठेवा. ते दररोज रात्री केसांना लावा. हा हेअर ग्रोथ स्प्रे केसांवर शिंपडा आणि टाळूवर चांगला घासून घ्या. दुसऱ्या दिवशी केस सौम्य शाम्पूनं धुवा. दररोज रात्री केसांना हा स्प्रे लावला तर केस रोज धुवावे लागतील असं नाही. तुम्ही आठवड्यातून दोनदा केस धुवू शकता. केस जलद वाढवण्यासाठी हा उपाय करून पहा. तांदळाच्या पाण्याचं हे मिश्रण केसांच्या वाढीसाठी उपयुक्त आहे. यामुळे केसांना चमक येते, केस मजबूत आणि मऊ देखील होतात.