कोणत्या जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे दात कमकुवत होतात ?
तुमचे दात मजबूत करण्यात महत्त्वाचं काम 'व्हिटॅमिन डी' कडे आहे. शरीरात कॅल्शियमचं शोषण सुधारणं, तसंच मौखिक आरोग्याबरोबरच हाडं मजबूत करण्यासाठी देखील हे जीवनसत्व आवश्यक आहे. या जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे दात कमकुवत होऊन तुटतात. तसंच हाडं फ्रॅक्चर होण्याची शक्यता देखील वाढते.
Heart Care : हृदय निरोगी ठेवण्यासाठी लक्षात ठेवा या गोष्टी, जीवनशैलीतले बदल ठरतील उपयोगी
advertisement
व्हिटॅमिन डीच्या कमतरतेवर मात कशी करावी ?
सूर्यप्रकाश हा व्हिटॅमिन डीच्या कमतरतेवर मात करण्यासाठीचा महत्त्वाचा नैसर्गिक स्रोत आहे. त्यासाठी सकाळी कोवळं ऊन अंगावर घेणं हा उपाय आहेच शिवाय तुमच्या आहारात आवश्यक बदल करून तुम्ही व्हिटॅमिन डीच्या कमतरतेवर मात करू शकता
फॅटी फिश, अंड्यातील पिवळ बलक, दूध आणि दही यांसारखे पदार्थ व्हिटॅमिन डीची भरपाई करण्यास मदत करू शकतात. व्हिटॅमिन डीच्या कमतरतेवर मात करण्यासाठी तुम्ही डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार सप्लिमेंट्स देखील घेऊ शकता.
Soaked Raisins : सकाळी रिकाम्या पोटी प्या भिजवलेल्या बेदाण्यांचं पाणी, प्रकृतीसाठी भरपूर फायदेशीर
दातांची काळजी घेण्यासाठी इतर टिप्सही लक्षात ठेवा
तुमच्या दातांच्या चांगल्या आरोग्यासाठी मऊ ब्रिस्टल टूथब्रश वापरा.
सकाळी आणि रात्री झोपण्यापूर्वी दात घासणं आवश्यक आहे.
फ्लोराईड टूथपेस्ट वापरा.
डेंटल फ्लॉसचा वापर करा.
दर 3-4 महिन्यांनी टूथब्रश बदला.
हिवाळ्याच्या हंगामात व्हिटॅमिन डीच्या कमतरतेचा धोका वाढतो, कारण थंडीच्या महिन्यांत सूर्यप्रकाश मिळत नाही. या काळात, नियमित आरोग्य तपासणी करून आपल्या शरीरातील जीवनसत्त्वांची पातळी योग्य आहे की नाही याचा आढावा घेऊ शकता आणि त्यानुसार डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आपल्या आहारात बदल करून स्वत:ला निरोगी ठेवू शकता.