कधी प्यावं पाणी?
आयुर्वेदानुसार, जास्त पाणी पिणे योग्य नाही. तहान लागेल तेव्हाच पाणी पिणे योग्य आहे आणि पाण्याचा हा फॉर्मुला आहे. आपल्या शरीरात पाणी पाचण्यासाठी ते हवेपेक्षा जास्त जड असते. त्यामुळे पाणी पचण्यास आपल्याला अडथळे निर्माण होतात. त्यामुळे आपल्या पोटात अपचणाच्या समस्या आपल्याला जाणवतात, असं अक्षय जैन सांगतात.
उन्हातून मिळतं व्हिटॅमिन-D, पण किती वाजताच्या उन्हातून? अवश्य घ्या जाणून
advertisement
आयुर्वेदानुसार सकाळी उठल्यावर पाणी पिण्याची वेळ ही ब्रह्ममुहूर्त आहे. त्यावेळी आपल्या शरीराचं तापमान वाढलेल असतं आणि बाहेर थंड वातावरण असतं. त्यामुळे ते पाणी आपण पचवू शकतो. परंतु सूर्योदय झाल्यानंतर पाणी पिल्यावर आपल्या शरीराचं तापमान कमी होतं आणि बाहेरचं तापमान वाढतं. त्यामुळे त्या पाण्याने आपल्याला अपचणाच्या समस्या उद्भतात. सकाळी पाणी पिल्याने आपलं शरीर स्वच्छ होतं असं अनेकांना वाटत परंतु सकाळी पिलेल्या पाण्याने शरीरावर त्याचे परिणाम होऊन केसगळती,ऍसिडिटी, सांधेदुखी यांसारख्या आजारचा सामना आपल्याला करायला लागतो, असंही डॉ. अक्षय जैन सांगतात.
Health Tips : स्नायू मजबूत बनवते ही डाळ! एका वाटीत मिळेल इतके प्रोटीन, त्यापुढे चिकन-अंडी होतील फेल
हिवाळ्यात किती पाणी प्यावे?
हिवाळ्यामध्ये बाहेर कमी उष्ण वातावरण असतं. तसेच आपल्या शरीराचे तापमान हे देखील कमी असतं अशावेळी आणि ते तापमान आपल्या शरीरातील अन्न पचण्यासाठी लागत. त्यामुळे पाणी पचण्यासाठी शरीराचं तापमान कमी असल्याने पाणी पचत नाही या कारणाने हिवाळ्यात तहान लागेल तेव्हाच पाणी प्यावे, असं आयुर्वेदिक डॉ. जैन यांनी म्हटलंय.