खंडूचक्काच्या पानाचा काय आहे उपयोग?
खंडूचक्काचा जो महत्त्वाचा उपयोग म्हणजे या पानाचा आपण चूर्ण करु शकतो आणि चूर्ण त्या सांध्याच्या दुखण्याच्या ठिकाणी लावता येतं. आणि त्याचा एक प्रकारे काढा करून मग ते तीळ तेलामध्ये जर आपण सिद्ध केलं तर त्याच्यामुळे होणारा जो आपल्याला जॉईंट पेन असतो तो लगेच कमी होतो. असं म्हटलं जातं की खंडू चक्क्याच्या पानांमध्ये जर आपण तुकडे केलेले मांस जर आपण बांधून ठेवले तर त्या मासाचा सुद्धा एक जीव काही कालांतराने तयार होतो ते हाडे जुळतात. अशाप्रकारे ही अतिशय उपयोगी वनस्पती आहे. आयुर्वेदामध्ये खंडूचक्क्याचा यथोचित वर्णन केलेला आहे. मुख्य म्हणजे वात शामक आहे. त्यानंतर कधीकधी एखादी जखम भरत नाही अशा वेळेस खंडू चक्क्याचं तेल आणि ज्याक्त्यादी तेल एकत्र केलं तर ती जखम भरून निघते, अशी माहिती डॉ. पंकज पवार यांनी दिली.
advertisement
सकाळी उठून पाणी पिणे फायद्याचे की तोट्याचे? पाहा डाॅक्टर काय सांगतात... Video
गँगरीन होते बरी
अनेकांना गॅंग्रीनचा त्रास होण्याचा जास्त धोका असतो. तर अशावेळी खंडूचक्क्याचे पान हे जर एक्स्टर्नल म्हणजे बाहेरून पायाला बांधले तर तिथलं ब्लड सर्कुलेशन सुरळीत होते.
उन्हातून मिळतं व्हिटॅमिन-D, पण किती वाजताच्या उन्हातून? अवश्य घ्या जाणून
असाही आहे फायदा
ज्यांना एक्झिमा होतं ज्यांना रोरियासिसचाही त्रास असतो अशा रुग्णांना सुद्धा आपण खंडू चक्क्याचं तेल जर लावलं तर ते सुद्धा व्रणरोपण किंवा स्किनचे सगळे प्रॉब्लेम यांनी पूर्णपणे बसतात. अशी ही बहुपयोगी, बहुकल्प, बहुगुणी वनस्पती आहे. असं आढळून आलेलं आहे की खंडू चक्क्याचे पान आणि तीळ तिलामध्ये जर लावले तर ज्यांना जॉईंट रिप्लेसमेंट किंवा सांध्याचं ट्रान्सप्लांट सांगितलेलं आहे ते सुद्धा या खंडूचक्क्यामुळे बरं होऊ शकते. वातशमन आहे, पेन किलर आहे. सांध्यामधले जे काही सूज आहे ती कमी करणारी ही बहुमोल, बहुगुणी उपयोगी आयुर्वेदिक वनस्पती आहे, असे डॉ. पवार सांगतात.
(सूचना : येथे दिलेली माहिती तज्ज्ञांचे वैयक्तिक मत आहे. त्याचे अनुकरण करण्यापूर्वी तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)





