TRENDING:

Health Tips : हिवाळ्यात खा रोज 1 चमचा मध, हे आजार जवळ पण नाही येणार, महत्त्वाच्या टिप्सचा Video

Last Updated:

हिवाळ्यात मध खाणे आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर मानले जाते. थंडीच्या दिवसांत शरीराची प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आणि अनेक त्रासांपासून संरक्षण मिळवण्यासाठी मध उपयुक्त ठरते. 

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
अमरावती : हिवाळ्यात अनेक पौष्टिक पदार्थ आणि साहित्य आहारात घेतले जातात. त्यातीलच एक म्हणजे मध. हिवाळ्यात मध खाणे आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर मानले जाते. थंडीच्या दिवसांत शरीराची प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आणि अनेक त्रासांपासून संरक्षण मिळवण्यासाठी मध उपयुक्त ठरते. तसेच हिवाळ्यात होणारा सर्दी खोकला देखील यामुळे कमी होतो. मध खाण्याचे आणखी बरेच फायदे आहेत. ते आपण जाणून घेऊया.
advertisement

1. हिवाळ्यात मधाचे सेवन केल्यास रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते. मधामध्ये अँटीऑक्सिडंट्स, अँटीबॅक्टेरियल आणि अँटीव्हायरल गुणधर्म असतात. त्यामुळे सर्दी, खोकला, घसा खवखवणे यापासून संरक्षण मिळते.

2. तसेच सर्दी-खोकला झाल्यास त्यावरही प्रभावी उपाय म्हणून मध काम करते. कोमट पाणी किंवा आल्याच्या रसासोबत मध घेतल्यास खोकला कमी होतो, घसा मऊ राहतो आणि कफ बाहेर पडण्यास मदत होते.

advertisement

Gajar Halwa Recipe: गाजर हलव्याची परफेक्ट रेसिपी, असा बनवाल तर बोटं चाखत बसाल, Video

3. हिवाळ्यात शरीराला उष्ण ठेवण्यास देखील मध गुणकारी आहे. हिवाळ्यात शरीरातील उष्णता कमी होते. मध नैसर्गिकरित्या शरीराला उष्णता देते आणि थंडीचा परिणाम कमी करण्यास मदत करते.

4. मधाने पचनक्रिया सुधारते. मध पचनसंस्थेला बळकटी देऊन बद्धकोष्ठता, आम्लपित्त यांसारख्या समस्या कमी करण्यास मदत होते.

advertisement

5. मधामध्ये नैसर्गिक साखर (ग्लुकोज, फ्रुक्टोज) असते, त्यामुळे थकवा कमी होतो आणि दिवसभर ऊर्जा टिकते.

6. त्वचा आणि केसांसाठी देखील मध फायदेशीर आहे. हिवाळ्यात त्वचा कोरडी पडते. मध त्वचेला ओलावा देते, ओठ फुटणे आणि त्वचा खरबरीत होणे कमी होते.

7. कोमट पाण्यासोबत मध घेतल्यास चयापचय सुधारतो आणि वजन नियंत्रणात ठेवण्यास मदत होते.

advertisement

मध कसं घ्यावं?

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
ख्रिसमससाठी आकर्षक कँडल्स, मिळतायत फक्त 50 रुपयांपासून, ठाण्यात इथं करा खरेदी
सर्व पहा

सकाळी उपाशीपोटी कोमट पाण्यासोबत 1 चमचा मध घेऊ शकता. तसेच आलं घालून सुद्धा मध तुम्ही घेऊ शकता. खूप गरम पाण्यात मध घालू नका. मधाचे प्रमाण मर्यादित ठेवा. दिवसाला 1 ते 2 चमचे मध पुरेसे आहेत.

मराठी बातम्या/लाइफस्टाईल/हेल्थ/
Health Tips : हिवाळ्यात खा रोज 1 चमचा मध, हे आजार जवळ पण नाही येणार, महत्त्वाच्या टिप्सचा Video
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल