तज्ज्ञांनी सांगितले की, झोप न येण्यामागील पहिले आणि महत्त्वाचे कारण म्हणजे मानसिक ताणतणाव आणि चिंता. कामाचा वाढता ताण, आर्थिक अस्थिरता, कौटुंबिक जबाबदाऱ्या आणि भविष्यासंबंधी भीती यामुळे मन अस्वस्थ राहते. रात्री झोपण्याच्या वेळी मेंदू सतत विचार करत राहिल्याने झोप लागत नाही. दीर्घकाळ असा ताण राहिल्यास नैराश्य, चिडचिड आणि एकाग्रतेचा अभाव निर्माण होतो.
advertisement
Garlic Chicken Recipe : हॉटेलची चवंच विसरून जाल, घरीच बनवा चमचमीत गार्लिक चिकन, रेसिपीचा Video
दुसरे कारण म्हणजे चुकीच्या जीवनशैलीच्या सवयी. झोपण्यापूर्वी मोबाईल, टीव्ही, लॅपटॉपचा अतिवापर हा आजचा सर्वात मोठा धोका ठरत आहे. स्क्रीनमधून निघणारा निळा प्रकाश मेलाटोनिन हार्मोनच्या निर्मितीत अडथळा आणतो, जे झोपेसाठी अत्यावश्यक आहे. तसेच उशिरा चहा, कॉफी किंवा एनर्जी ड्रिंक्स घेतल्याने शरीर सतर्क राहते आणि झोप उडते.
तिसरे महत्त्वाचे कारण म्हणजे आहारातील चुका आणि आरोग्य समस्या. उशिरा किंवा जड, तेलकट जेवण केल्याने पचनसंस्थेवर ताण येतो. ॲसिडिटी, पोटदुखी, श्वसनाचे आजार, सांधेदुखी किंवा दीर्घकालीन वेदना यामुळे झोपेत वारंवार व्यत्यय येतो. काही औषधांचे दुष्परिणाम देखील झोपेवर परिणाम करतात, असे तज्ज्ञांनी नमूद केले.
दरम्यान, तज्ज्ञांनी नागरिकांना वेळेवर झोपण्याची सवय लावणे, झोपण्यापूर्वी स्क्रीनचा वापर टाळणे, हलका आणि संतुलित आहार घेणे आणि नियमित व्यायाम करण्याचा सल्ला दिला आहे. झोप ही आरोग्याची गुरुकिल्ली असून तिच्याकडे दुर्लक्ष केल्यास गंभीर परिणामांना सामोरे जावे लागू शकते असा इशारा यावेळी देण्यात आला.





