डॉक्टरांच्या मते, आयुर्वेदात नियमित आंघोळ करणं हे एक उपचारात्मक काम मानलं जातं. यामुळे शरीर, मन आणि आत्मा ताजेतवाने राहण्यास मदत होते. जे लोक रोज आंघोळ करतात, त्यांना अनियमित आंघोळ करणार्यांच्या तुलनेत वेदना, ताण आणि नैराश्य यांसारखी लक्षणं कमी जाणवतात. इतकंच नाही, तर आंघोळ केल्याने मानसिक आणि शारीरिक आरोग्यही सुधारतं.
आंघोळ करण्याची सर्वोत्तम वेळ
advertisement
डॉ. शचि श्रीवास्तव सांगतात, की आयुर्वेदात सकाळी आंघोळ करणं सर्वात फायदेशीर मानलं जातं. मात्र, दररोजच्या दिनचर्येत व्यायाम केल्यानंतर थोड्या वेळाने आंघोळ करावी. खरं तर, व्यायाम केल्यानंतर शरीर थकून जातं, अशा परिस्थितीत आंघोळ केल्याने आराम मिळण्यास मदत होते. यासाठी, तुम्ही सकाळी सूर्योदयापूर्वी किंवा सूर्यास्तापूर्वी आंघोळ करू शकता.
कधी आंघोळ करू नये?
- जेवणानंतर : जेवणानंतर कधीही आंघोळ करू नये. खरं तर, जेवणानंतर लगेच आंघोळ केल्यास, तुम्ही खाल्लेल्या अन्नाला पचवणारी पचनशक्ती कमी होते. त्यामुळे अन्न पचत नाही आणि पोटाशी संबंधित आजारांचा धोका असतो.
- दुपारी : कडक उन्हात दुपारी आंघोळ केल्याने अनेक आजारांचा धोका असतो. यामुळे स्नायूंना झाकणाऱ्या पेशींमध्ये जळजळ होते, ज्याला मायोसायटिस म्हणतात. यामध्ये, मान, कंबर आणि गुडघेदुखी इत्यादी तक्रारी सुरू होतात. यासोबतच, ही सवय अनेक डोळ्यांच्या आजारांचं मुख्य कारण मानली जाते.
- रात्री : आयुर्वेदात रात्री आंघोळ करणं चुकीचं मानलं जातं, विशेषतः लांब आणि दाट केस असलेल्या लोकांसाठी, रात्री आंघोळ केल्याने समस्या निर्माण होऊ शकतात. खरं तर, रात्री आंघोळ केल्याने केस व्यवस्थित वाळत नाहीत आणि मायोसायटिस नावाच्या आजाराचा धोका असतो. मात्र, केस ओले होणं टाळून आंघोळ केल्यास हा धोका कमी होऊ शकतो.
हे ही वाचा : व्यायामापूर्वी प्या 'हे' खास घरगुती एनर्जी ड्रिंक, मिळेल भरपूर ताकद अन् होईल मसल्स ग्रोथ! कशी तयार कराल ड्रिंक?
हे ही वाचा : पायांच्या 'या' बदलांकडे चुकूनही दुर्लक्ष करू नका, अन्यथा येऊ शकतो हार्ट अटॅक! त्वरित डाॅक्टरांना भेटा...
