TRENDING:

मेनोपॉजच्या काळात आरोग्याची घ्या विशेष काळजी, काय करावे आणि काय टाळावे? पाहा डॉक्टरांचा सल्ला, Video

Last Updated:

विशेषतः वयाच्या चाळीशीनंतर शरीरात होणारे बदल ओळखून त्याची योग्य काळजी घेणे गरजेचे असते. मेनोपॉज हा या प्रवासातील एक महत्त्वाचा टप्पा आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
नमिता सूर्यवंशी, प्रतिनिधी 
advertisement

मुंबई: स्त्रिया कायमच कुटुंब आणि जबाबदाऱ्यांसाठी स्वतःला झोकून देतात, पण स्वतःच्या आरोग्याकडे मात्र सहज दुर्लक्ष करतात. विशेषतः वयाच्या चाळीशीनंतर शरीरात होणारे बदल ओळखून त्याची योग्य काळजी घेणे गरजेचे असते. मेनोपॉज हा या प्रवासातील एक महत्त्वाचा टप्पा आहे. या काळात महिलांनी काय काळजी घ्यावी आणि काय करावे? काय करू नये? याबद्दल स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. प्रीति पिंपळकर यांनी सांगितलं आहे .

advertisement

मेनोपॉज म्हणजे काय?

मेनोपॉज म्हणजेच रजोनिवृत्ती. हा 45 ते 55 वयोगटातील महिलांमध्ये होणारा नैसर्गिक बदल आहे. या काळात हार्मोन्स कमी होतात आणि मासिक पाळी कायमची थांबते. त्यामुळे शरीरात अनेक बदल होतात. मेनोपॉज व्हायच्या आधी स्त्रियांची मासिक पाळी अनियमित होते, जास्त ब्लिडिंग होतं. मानसिक आणि शारीरिक थकवा जाणवायला लागतो. अशा भावना निर्माण होतात, ज्या आधी कधीच अनुभवलेल्या नसतात, असं डॉ. प्रीति पिंपळकर सांगतात.

advertisement

उन्हाळ्यात जळजळ अन् डोळ्यातून पाणी, फॉलो करा 5 टिप्स, तुमचे डोळे राहतील निरोगी

मेनोपॉजचे लक्षण कोणती ?

1)हॉट फ्लॅशेस

2)रात्री जास्त घाम येणे

3)चिडचिड आणि तणाव

4)झोप न येणे

5)हाडांची झीज (ऑस्टिओपोरोसिस)

6) व्हजायनल ड्रायनेस

7) ब्लॅडर प्रॉब्लेम

सगळ्याच महिलांना ही लक्षणं जाणवतात असं नाही, पण 75 टक्के महिलांना यातली लक्षणं जाणवतात. तर उरलेल्या एक चतुर्थांश महिलांना गंभीर लक्षणं दिसून येतात.

advertisement

अकाल मेनोपॉज म्हणजे काय?

काही महिलांना 40 वर्षांपूर्वीच मेनोपॉज होतो, याला अकाल मेनोपॉज म्हणतात. हे अनुवंशिकता, धूम्रपान, गंभीर आजार, कीमोथेरपी किंवा गर्भाशय काढण्याच्या शस्त्रक्रियेमुळे होऊ शकते.

महिलांनी काय करावे आणि काय टाळावे?

महिलांनी मेनोपॉजच्या काळात आरोग्याची विशेष काळजी घ्यावी. कॅल्शियम आणि प्रथिनयुक्त आहार घ्या नियमित व्यायाम, योग आणि चालण्याचा सराव करा. मानसिक तणाव कमी करण्यासाठी ध्यानधारणा करा. त्याबरोबरच हाडे मजबूत ठेवण्यासाठी डॉक्टरांच्या सल्ल्याने सप्लिमेंट्स घ्या.

advertisement

त्याचबरोबर महिलांनी या गोष्टी टाळल्या पाहिजेत जास्त साखर, कॅफिन आणि तेलकट पदार्थ टाळा. धूम्रपान आणि मद्यपान करू नका. कमी झोप आणि तणाव टाळा. स्वतःच्या आरोग्यावर लक्ष द्या. योग्य आहार आणि जीवनशैली अंगीकारल्यास मेनोपॉजच्या त्रासावर नियंत्रण मिळवता येऊ शकते. योगासन, नियमित चालणे आणि वेट ट्रेनिंगसारख्या व्यायामांचा समावेश करण आरोग्यासाठी फायदेशीर आहे. यामुळे मेनोपॉजचा त्रास कमी करता येतो. महिलांनी स्वतःच्या आरोग्याला प्राधान्य देणे आवश्यक आहे, कारण जेव्हा तुम्ही स्वतःसाठी वेळ काढाल, तेव्हाच तुम्ही आनंदी, निरोगी आणि सक्षम राहू शकाल, असंही डॉ. प्रीति पिंपळकर यांनी सांगितलं.

मराठी बातम्या/लाइफस्टाईल/हेल्थ/
मेनोपॉजच्या काळात आरोग्याची घ्या विशेष काळजी, काय करावे आणि काय टाळावे? पाहा डॉक्टरांचा सल्ला, Video
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल