TRENDING:

Rice : पांढरा की ब्राऊन राईस? कोणत्या तांदळाचा भात शरिरासाठी फायदेशीर?, Video

Last Updated:

भात हा आपल्या देशातील जवळपास 70 ते 80 टक्के लोकांच्या जेवणातील अविभाज्य घटक आहे. तांदळामध्ये पांढरा आणि ब्राऊन राईस हा प्रकार आहे. पां

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
advertisement

आपल्याकडे भाताचे दोन प्रकार असतात. एक पांढरा तांदळाचा भात आणि दुसरा ब्राऊन तांदळाचा भात. पांढरा तांदळाचा भात आपल्याकडे मोठ्या प्रमाणात करून खाल्ला जातो. पण पांढऱ्या तांदळापेक्षा ब्राऊन तांदूळ हा चांगला आहे, असं मंजू मठाळकर सांगतात.

Egg Benefits : प्रोटीन मिळवण्यासाठी अंड्यांवर मारताय ताव? पण गावरान की बॉयलर कोणतं खाणं चांगले?

advertisement

तसंच अजून एक तांदळाचा प्रकार म्हणजे की हातसडीचा तांदूळ हा देखील तांदळाचा प्रकार आहे आणि तो देखील खाणं चांगले आहे. पांढऱ्या तांदळापेक्षा ब्राऊन तांदळामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये फायबर असतात आणि ते आपल्या शरिरासाठी फायदेशीर ठरतात. तसंच की ब्राऊन राईसमध्ये मोठ्या प्रमाणात न्यूट्रिएंट असतात. तसंच हा राईस खाल्ल्यामुळे शुगर लेवल जास्त वाढत नाही.

advertisement

तसेच ब्राउन राईसमध्ये मोठ्या प्रमाणात बी कॉम्प्लेक्स विटामिन्स आणि न्यूट्रिएंट असतात जे की शरिरासाठी चांगले असतात आणि हेच पांढऱ्या तांदळामध्ये नसतात कारण की ते पॉलिश केलेले असतात. यामध्ये इतरही पोषक घटक पांढऱ्या तांदळामध्ये कमी असतात.

तसेच जर तुम्ही दररोज भात खात असाल तर नुसता भात तुम्ही खाऊन त्याच्यासोबत भरपूर भाजी घ्यावी. तसेच वरण देखील असले पाहिजे जेणेकरून ते पचायला सोपं जातं आणि इतरही पोषक घटक आपल्या शरिरामध्ये जातात. तसंच ज्यांना शुगर वगैरे आहे त्यांनी भात कमी प्रमाणात खावा, असं आहार तज्ज्ञ मंजू मठाळकर सांगतात.

advertisement

मराठी बातम्या/लाइफस्टाईल/हेल्थ/
Rice : पांढरा की ब्राऊन राईस? कोणत्या तांदळाचा भात शरिरासाठी फायदेशीर?, Video
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल