TRENDING:

सकाळी घरातून नाश्ता न करता बाहेर पडतायत? आधी 'ही' सवय मोडा; नाहीतर होवू शकतात विपरीत परिणाम Video

Last Updated:

खाण्या पिण्याची अयोग्य सवय आणि व्यस्त जीवनशैली याचा आपल्या शरीरावर विपरीत परिणाम होवू शकतो.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
कोल्हापूर,12 डिसेंबर : आजकालच्या धकाधकीच्या जीवनात बरेचजण सकाळी गडबडीने घरातून कामाला जायला बाहेर पडतात. अशावेळी कित्येकदा नाश्ता करणे राहून जाते. पण अशा परिस्थितीत खाण्या पिण्याची अयोग्य सवय आणि व्यस्त जीवनशैली याचा आपल्या शरीरावर विपरीत परिणाम होवू शकतो, असे आहारतज्ज्ञ सांगतात. कोल्हापूरच्या आहारतज्ज्ञ अमृता सूर्यवंशी यांनी सकाळी नाश्ता करण्याबद्दल माहिती दिली आहे.
advertisement

घरातील वडीलधारी मंडळी नेहमी सांगत असतात की, सकाळी दोन घास खाऊनच घराबाहेर पडावे. कारण उपाशी पोटी ना कुठे मन लागते ना कुठे आपली बुध्दीमत्ता काम करते. कित्येकदा त्याचा परिणाम आपल्याला दिवसभर देखील भोगावा लागतो, असे आहारतज्ज्ञ अमृता सुर्यवंशी यांनी सांगितले आहे.

शरीराला प्रोटीनसाठी काय खावं? कोणत्या पदार्थांनी होईल फायदा पाहा PHOTOS

advertisement

नाश्ता म्हणजे काय?

नाश्त्याला खरंतर इंग्रजी भाषेत ब्रेकफास्ट म्हणतात. रात्रीच्या जेवणापासून सकाळपर्यंत जो फास्ट अर्थात उपवास घडलेला असतो. त्याला ब्रेक करणे म्हणजेच तो उपवास मोडणे यालाच ब्रेकफास्ट किंवा नाश्ता म्हणतात. त्यामुळेच सकाळी थोडफार काहीतरी खाऊन हा रात्रभराचा उपवास मोडणे अती गरजेचे असते, असे अमृता सांगतात.

का आहे सकाळी नाश्ता करण्याची गरज?

advertisement

सकाळचा नाश्ता हा शरीरासाठी गरजेची उर्जा पुरवणारा सर्वात मोठा स्रोत असतो. ही ऊर्जा आपल्या दैनंदिन कामासाठी अती महत्त्वाची असते. मग ते काम बैठे असो किंवा शारीरिक श्रमाचे असो, कोणतेही काम करण्यासाठी ऊर्जा लागते. सकाळी नाश्ता करूनच घराबाहेर पडणे, खालील कारणांसाठी गरजेचे आहे.

1) आपले कोणत्याही पद्धतीचे काम असले तरी सकाळच्या नाश्त्याला काही खाल्या खेरीज आपल्याला शारीरिक उर्जा प्राप्त होत नाही.

advertisement

2) रक्तात साखरेचे प्रमाण हे नेहमी कमी जास्त होत असते. मात्र ही. रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यासाठी देखील सकाळचा नाश्ता महत्त्वाचा असतो.

तणावामुळे कमी होतो हॅप्पी हार्मोन, स्वत:ला ठेवायचंय रिलॅक्स तर या 2 गोष्टी करा

3) रात्रभराचा उपवास घडल्यानंतर शरीरातील पचन संस्थेवर परिणाम झालेला असतो. त्यामुळे पचनसंस्थेचे कार्य सुरळीत चालण्यासाठी सकाळचा नाश्ता करावाच.

advertisement

4) सकाळी नाश्ता न केल्यामुळे आपण सकाळी थोड्या वेळाने भूक लागू शकते. मग अशावेळी बाहेरचे काही खाऊन त्या गोष्टी वजन वाढीवर परिणाम करतात. त्याऐवजी सकाळी पौष्टिक नाश्ता कधीही योग्यच ठरतो.

5) नाश्ता न केल्यामुळे आपल्या विचारांवर देखील परिणाम होऊ शकतो. मेंदूचे कार्य नीट न होऊन कामावर मन एकाग्र होऊ शकत नाही. 

6) नाश्ता न केल्यामुळे कशातच उत्साही वाटत नाही. अशावेळी काम नीट पूर्ण न झाल्याने तणाव आणि नैराश्याची समस्या देखील सुरू होऊ शकतात.

दरम्यान नाश्त्यामध्ये काय खावे हा देखील बऱ्याच जणांना पडणारा प्रश्न असतो. त्यामुळे आपल्या शरीरासाठी पौष्टिक, उर्जा देणारी फळे, कडधान्ये, अंडी अशा गोष्टी नाश्त्याला खाता येतात. त्याचबरोबर शिरा, उपमा, पोहे, डोसा, इडली, उत्तापा असे घरगुती पदार्थही आपण नाश्त्याला खाऊ शकतो, असेही अमृता सूर्यवंशी यांनी स्पष्ट केले आहे.

मराठी बातम्या/लाइफस्टाईल/हेल्थ/
सकाळी घरातून नाश्ता न करता बाहेर पडतायत? आधी 'ही' सवय मोडा; नाहीतर होवू शकतात विपरीत परिणाम Video
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल