TRENDING:

Gut Health : शरीराचे संकेत ओळखायला शिका, पोटदुखी, अपचनाच्या समस्या वेळेत येतील आटोक्यात

Last Updated:

अवेळी खाणं आणि धावपळीमुळे पोटाच्या समस्यांचं प्रमाण वाढलंय. आपली पचनसंस्था केवळ अन्न पचवत नाही, तर ती आपल्या संपूर्ण आरोग्यासाठीही जबाबदार असते. त्यामुळे, आतड्यांचं आरोग्य बिघडलं तर अनेक गंभीर आजार होऊ शकतात. आतड्यांचं आरोग्य बिघडल्याचं दर्शवणारे सहा संकेत जाणून घेऊया. ही चिन्हं दिसून आली तर आतड्यांचं आरोग्य सुधारणं शक्य होतं.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : पोट दुखणं, अपचन यासारख्या समस्यांचं प्रमाण वाढलं असेल तर तर हे पचनसंस्था योग्यप्रकारे काम करत नसल्याचं लक्षण आहे.
News18
News18
advertisement

अवेळी खाणं आणि धावपळीमुळे पोटाच्या समस्यांचं प्रमाण वाढलंय. आपली पचनसंस्था केवळ अन्न पचवत नाही, तर ती आपल्या संपूर्ण आरोग्यासाठीही जबाबदार असते. त्यामुळे, आतड्यांचं आरोग्य बिघडलं तर अनेक गंभीर आजार होऊ शकतात. आतड्यांचं आरोग्य बिघडल्याचं दर्शवणारे सहा संकेत जाणून घेऊया. ही चिन्हं दिसून आली तर आतड्यांचं आरोग्य सुधारणं शक्य होतं.

पोटात गॅस आणि पोट फुगणं - पोटात वारंवार गॅस होणं, पोट फुगणं किंवा अपचनाचा त्रास होत असेल, तर हे आतड्यांचं आरोग्य खराब असल्याचं हे लक्षण असू शकतं.

advertisement

Early Menopause : लवकर रजोनिवृत्ती येणं का ठरु शकतं घातक, महिलांच्या आरोग्यावर काय परिणाम होतात ?

पचनमार्गातील वाईट जीवाणू योग्य पचनात अडथळा आणतात, ज्यामुळे गॅस होतात आणि पोट फुगतं. ही समस्या बराच काळ टिकून राहिली, तर त्याकडे दुर्लक्ष करू नका.

बद्धकोष्ठता किंवा व्यवस्थित शौचास न होणं - आतड्यांचं आरोग्य खराब असल्याचं आणखी एक महत्त्वाचं लक्षण म्हणजे शौचास व्यवस्थित न होणं. बद्धकोष्ठता, अतिसार किंवा शौचाला विचित्र वास येणं हे पचनसंस्थेतील समस्येचं लक्षण आहे. वारंवार बद्धकोष्ठता किंवा अतिसाराचा त्रास होत असेल, तर तो आतड्यातील जीवाणूंच्या असंतुलनामुळे होऊ शकतो.

advertisement

थकवा आणि अशक्तपणा - थकवा आणि अशक्तपणा जाणवत असेल, आतड्यांचं आरोग्य खराब असल्याचं लक्षण असू शकतं. अन्न व्यवस्थित पचत नाही किंवा अन्नातील पोषक घटक योग्यरित्या शोषले जात नाहीत, तेव्हा नेहमी थकवा किंवा अशक्तपणा जाणवतो.

त्वचेच्या समस्या – आतड्यांचं आरोग्य खराब असेल तर मुरुम येणं, एक्झिमा किंवा पुरळ यांसारख्या त्वचेच्या समस्या देखील लक्षण असू शकतात. आतडी आणि त्वचा यांचा जवळचा संबंध असतो. आतड्यांमधील सूज किंवा चांगल्या आणि वाईट जीवाणूंचे असंतुलन त्वचेवर नकारात्मक परिणाम करू शकतं. त्वचेच्या समस्या दीर्घकाळ असतील, तर पचनसंस्थेतील बिघाडामुळे हा त्रास जाणवू शकतो.

advertisement

Anti roach : झुरळांना बाय बाय करण्यासाठी घरातले जिन्नस ठरतील उपयोगी, झुरळं होतील गायब

वजनात अचानक बदल – वजन वाढणं किंवा कमी होणं हे आतड्यांच्या आरोग्याच्या समस्येचं लक्षण असू शकतं. आतड्यातील जीवाणू शरीराच्या चयापचय क्रियेवर नियंत्रण ठेवतात. या जीवाणूंचं संतुलन बिघडलं, तर शरीराचं वजन वाढू किंवा कमी होऊ शकतं.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
उन्हाळ्यात लिंबूचे दर तापले, कांद्याला सरासरी दर, APMC मार्केटमधून नवी अपडेट
सर्व पहा

मनःस्थितीतील चढउतार आणि चिंता - आपल्या आतड्यांचा आणि मेंदूचा एक घनिष्ट संबंध असतो, ज्याला gut-brain axis म्हणतात. आतड्यांचं आरोग्य खराब असण्याचा थेट परिणाम आपल्या मानसिक आरोग्यावर होतो. मनःस्थितीत वारंवार चढउतार, चिंता किंवा नैराश्य जाणवत असेल, तर त्याचा परिणाम तुमच्या पचनक्रियेवरही होऊ शकतो.

मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Gut Health : शरीराचे संकेत ओळखायला शिका, पोटदुखी, अपचनाच्या समस्या वेळेत येतील आटोक्यात
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल