तुम्ही फिल्ममध्ये वगैरे पाहिलं असेल की डॉक्टर रुग्णांच्या छातीवर आपले दोन्ही हात ठेवून त्यावर विशिष्ट वेळाने दाब देतात किंवा हिरो हिरोईनच्या तोंडात तोंड घालून तिला श्वास देतो आणि तिचा जीव वाचवतो. काहीवेळा अपघातात तोंडाला जखम झाली तर तोंडातून श्वास घेता येत नाही, अशा परिस्थितीत नाकातूनही श्वास दिला जातो. यामुळे त्या व्यक्ती किंवा रुग्णाच्या फुफ्फुसांपर्यंत ऑक्सिजन पोहचतो. यामुळे शरीरात अगोदरच असलेल्या ऑक्सिजनमिश्रित रक्ताला चालना मिळते. हीच प्रक्रिया म्हणजे सीपीआर ज्याचा फुलफॉर्म आहे कार्डिओ पल्मोनरी रिसुसिटेशन.
advertisement
सीपीआरमुळे काय होतं?
जर एखाद्या व्यक्तीचा श्वासोच्छ्वास किंवा हृदयाचे ठोके बंद झाले असतील, तर पुरेशा ऑक्सिजनअभावी तिच्या शरीरातील पेशी मृत होऊ लागतात. या गोष्टीचा व्यक्तीच्या मेंदूवर परिणाम होतो. यामुळे काहीवेळा व्यक्तीचा मृत्युदेखील होतो. अशा परिस्थितीत सीपीआर दिल्यास जीव वाचू शकतो.
Heart Attack : हार्ट अटॅकपासून वाचवणारी 'गोल्डन किट', किंमत फक्त 10 रुपये
व्यक्तीचा श्वास कोंडला जातो. तिला सामान्यपणे श्वास घेता येत नाही. अशा स्थितीत त्या व्यक्तीला कृत्रिम ऑक्सिजनची अत्यंत आवश्यकता असते. मात्र, प्रत्येक व्यक्तीला वेळेवर वैद्यकीय मदत मिळेलच याची शाश्वती नसते. अशा वेळी सीपीआर फार उपयुक्त ठरतो. यामुळे शरीरातील रक्तप्रवाह सामान्य होण्यास मदत होते.
सीपीआर ही साधीसोपी आपत्कालीन उपचार प्रक्रिया आहे. मात्र, त्यासाठी बेसिक प्रशिक्षणाची आवश्यकता आहे. त्या व्यक्तीला सीपीआरची गरज आहे की नाही हे लक्षात येणं आवश्यक आहे. अशा परिस्थितीमध्ये जर तुम्ही प्रशिक्षित असाल तरच त्याचा वापर करावा, असा सल्ला तज्ज्ञ देतात. सीपीआर कसा द्यायचा हे माहीत असल्यास संकटकाळी एखाद्या व्यक्तीचा जीव वाचवता येतो.
सीपीआर कसा द्यायचा?
रुग्णाला ताबडतोब सपाट पृष्ठभागावर त्याच्या पाठीवर सरळ झोपवा.
आता तुमचा एक हात दुसऱ्या हातावर ठेवा. दोन्ही हात रुग्णाच्या छातीच्या मध्यभागी ठेवा. कोपर पूर्णपणे सरळ ठेवा.
तुमच्या हातांवर वजन ठेवा आणि त्यांना जोरात दाबा. एका मिनिटात कमीत कमी 100 वेळा हे करण्याचा प्रयत्न करा.
भारतीयांचं हृदय धोक्यात! फॉरेनर्सपेक्षा हार्ट अटॅकचा जास्त धोका, डॉक्टरांनी सांगितलं कारण
छातीवर 30 वेळा दाब दिल्यानंतर तोंडातून तोंडाने दोनदा श्वास घ्या. याला तोंडातून तोंडाने श्वसन म्हणतात.
छातीवर तळहाताने एक ते दोन इंच दाबल्यानंतर, ती पुन्हा सामान्य स्थितीत येऊ द्या. रुग्णाला श्वास परत येईपर्यंत किंवा तो वैद्यकीय आपत्कालीन स्थितीत येईपर्यंत हे करा.
इतक्या वेगाने पंपिंग केल्याने, हृदयात रक्त प्रवाह पूर्ववत होतो आणि हृदयविकाराच्या झटक्याने ग्रस्त असलेल्या व्यक्तीचे प्राण वाचवता येतात.