TRENDING:

Uric Acid : आवश्यक आहे म्हणून प्रथिनं जास्त खाऊ नका, शरीरावर होतात गंभीर परिणाम

Last Updated:

जास्त प्रथिनं खाणं आरोग्यासाठी हानिकारक ठरु शकतं. प्रथिनं आपल्या शरीरासाठी आवश्यक आहेत, पण जर जास्त प्रमाणात खात असाल, तर यामुळे युरिक अ‍ॅसिडची पातळी वाढू शकते. हे ओळखण्यासाठी कोणती लक्षणं लक्षात ठेवणं आवश्यक आहे जाणून घेऊया.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : प्रथिनं हा शरीरासाठी आवश्यक घटक आहे. पण काहीवेळा आवश्यक म्हणून प्रथिनयुक्त आहार जास्त घेतला जातो.
News18
News18
advertisement

जास्त प्रथिनं खाणं आरोग्यासाठी हानिकारक ठरु शकतं. प्रथिनं आपल्या शरीरासाठी आवश्यक आहेत, पण जर जास्त प्रमाणात खात असाल, तर यामुळे युरिक अ‍ॅसिडची पातळी वाढू शकते. हे ओळखण्यासाठी कोणती लक्षणं लक्षात ठेवणं आवश्यक आहे जाणून घेऊया.

फिटनेस आणि आरोग्यासंबंधित ट्रेंडस वाढतायत. त्यामुळे जास्त प्रथिनयुक्त आहाराचा वापर वाढलाय. जिमला जाणारे, बॉडीबिल्डर्स किंवा वजन कमी करण्याचा प्रयत्न करणारे अनेकजण बहुतेकदा त्यांच्या आहारात प्रथिनांचं प्रमाण वाढवतात.

advertisement

Vision Loss: डायबिटिस आहे? डोळ्यांची काळजी घ्या, या हेल्थ टिप्स जरुर वाचा

आपल्या शरीरात प्युरीनच्या विघटनानं युरिक अ‍ॅसिड तयार होतं. काही पदार्थांमुळे, विशेषतः जास्त प्रथिनयुक्त पदार्थ, ज्यात प्युरीन असतं. हे पदार्थ जास्त प्रमाणात खाल्ले जातात तेव्हा शरीरातील युरिक अ‍ॅसिडचं उत्पादन वाढतं.

मांसाहार - लाल मांस, ऑर्गन मीट, सीफूड आणि काही प्रकारचे मासे यामधे प्युरिनचं प्रमाण जास्त असतं. ते जास्त प्रमाणात खाल्ल्यानं यूरिक अ‍ॅसिडची पातळी वाढू शकते.

advertisement

वनस्पती-आधारित प्रथिने - मसूर, राजमा, हरभरा, पालक, मशरूम यामधे देखील प्युरिन असतं, परंतु ते सामान्यतः प्राण्यांच्या प्रथिनांपेक्षा कमी धोकादायक असतात.

म्हणून, प्रथिनं, विशेषतः मांस आणि समुद्री खाद्यपदार्थांचं प्रमाण मर्यादित ठेवा. हे जास्त प्रमाणात खाल्ल्यानं शरीरात प्युरिनचं प्रमाण वाढतं, ज्यामुळे यूरिक ऍसिडची पातळी वाढू शकते.

सांधेदुखी आणि सूज येणं हे युरिक अ‍ॅसिड वाढल्याचं सर्वात सामान्य लक्षण आहे. ही वेदना बहुतेकदा रात्री किंवा सकाळी उठल्यानंतर अचानक सुरू होते. ती सामान्यतः पायाच्या सांध्यामधे होते, परंतु घोटे, गुडघे, घोटे, मनगट आणि बोटांतही होऊ शकते.

advertisement

ज्या भागात अ‍ॅसिड वाढलंय ते सांधे लाल होऊ शकतात, सुजू शकतात.

सांध्यांतला ताठरपणा - युरिक अ‍ॅसिडची पातळी वाढल्यानं सांध्यांच्या हालचालीवर परिणाम होऊ शकतो. हालचाल करताना वेदनादायक होऊ शकतात आणि कडक वाटू शकतात.

Skin Care: हिवाळ्यात चेहऱ्याचं टेन्शन सोडा, टोमॅटो फेस पॅकमुळे चेहरा करेल ग्लो

त्वचेवर खाज येणं आणि पुरळ येणं - त्वचेखाली युरिक अ‍ॅसिडचे खडे जमा होतात, ज्याला टोफी म्हणतात. हे पांढरे किंवा मोत्यासारखे किंवा गाठींसारखे दिसू शकतात, जे सहसा बोटांवर, कानांवर, कोपरांवर किंवा गुडघ्यांवर तयार होतात. त्यांच्या सभोवतालची त्वचा खाज सुटू शकते आणि जळू शकते.

advertisement

थकवा आणि अस्वस्थता - शरीरात सतत सूज आणि वेदनांमुळे, एखाद्या व्यक्तीला असामान्य थकवा आणि अस्वस्थता जाणवू शकते.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
एका एकरात केली काकडी लागवड, 60 दिवसांत 1 लाख कमाई,शेतकऱ्याने सांगितला फॉर्म्युला
सर्व पहा

मूत्रपिंडाच्या समस्या - युरिक अ‍ॅसिडचं प्रमाण वाढल्यानं मूत्रपिंडांवरही विपरीत परिणाम होऊ शकतो. यामुळे किडनी स्टोनचा धोका वाढतो, ज्यामुळे पाठीच्या खालच्या भागात किंवा ओटीपोटात तीव्र वेदना, लघवी करताना जळजळ किंवा रक्तस्त्राव अशी लक्षणं दिसू शकतात.

मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Uric Acid : आवश्यक आहे म्हणून प्रथिनं जास्त खाऊ नका, शरीरावर होतात गंभीर परिणाम
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल