जाणून घेऊयात घरात तुळस लावण्याचे फायदे
हवा शुद्ध करते
झाडं दिवसा प्राणवायू देतात आणि रात्री कार्बनडाय ऑक्साईड सोडातात असं आपण शाळेत असताना विज्ञानाच्या पुस्तकात वाचलं होतं. मात्र तुळशीचं झाडं याला अपवाद आहे. तुळशीचं झाड 24 तास ऑक्सिजन हवेत सोडत असतं. त्यामुळे ज्यांच्या घरात, दारात तुळस असते त्या वातावारणात ऑक्सिजनचं प्रमाण इतर भागापेक्षा जास्त राहून हवा शुद्ध राहते. तुळस ही सल्फर डाय ऑक्साईड, मोनोऑक्साइड यासारखे विषारी वायू शोषून घेते. जिथे तुळस लावलेली असते तिथे एक विशिष्ठ प्रकारचा सुगंध पसरतो. यामुळे मनःस्थिती प्रसन्न राहायला मदत होते. याशिवाय तुळशीच्या रोपांमध्ये डासनाशक गुणधर्म आढळतात, ज्यामुळे जिथे तुळशीची लागवड केली जाते तिथे डास कमी दिसून येतात.
advertisement
हे सुद्धा वाचा : Benefits of Tulsi काय सांगता! तुळस रोखू शकते हार्ट ॲटॅक?
आरोग्यदायी तुळस
आयुर्वेदात तुळशीच्या फायद्यांचा उल्लेख केला गेलाय. तुळशीच्या पानांमध्ये अँटीऑक्सिडंट्स आणि अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म असतात, ज्यामुळे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती सुधारते. तुळशीचा अर्क सर्दी, खोकला, ताप, आणि श्वसनाच्या समस्यांवर प्रभावी असतो. तुळशीचे सेवन केल्याने पचनक्रिया सुधारते आणि पोटाच्या तक्रारी कमी होतात. तुळशीच्या पानांच्या नियमित सेवनाने कर्करोग, हृदयरोग, श्वसनाच्या समस्या आणि त्वचेच्या आजारांमध्येही फायदा होतो.
त्यामुळे इतकी बहुगुणी असलेली तुळस प्रत्येकाच्या घरात असायलाच हवी.