केसांच्या समस्येकडे दुर्लक्ष केलं तर केस गळतात आणि टक्कल पडतं. अशा वेळी, केमिकलयुक्त कंडिशनर आणि हेअर मास्क तात्पुरते चमक देतात, पण केसांच्या अंतर्गत संरचनेला हानी पोहोचू शकते. म्हणूनच, केस गळती थांबवण्यासाठी घरगुती हेअर पॅक फायदेशीर ठरू शकतात.
Acid Reflux : अॅसिड रिफ्लक्स म्हणजे काय ? यावर कोणते उपचार करायचे ?
advertisement
केळी आणि मध वापरून हेअर पॅक बनवा - पिकलेली केळी आणि मध यांचं मिश्रण कोरड्या केसांवर उपचार करण्यासाठी खूप उपयुक्त आहे. केळ्यामधे पोटॅशियम, नैसर्गिक तेल आणि जीवनसत्त्वं असतात, यामुळे केसांची लवचिकता वाढते, तर मध एक नैसर्गिक मॉइश्चरायझर आहे.
हा पॅक बनवण्यासाठी, एक पिकलेलं केळ कुस्करा आणि त्यात एक चमचा मध घाला. हे मिश्रण केसांना मुळांपासून टोकांपर्यंत लावल्यानं नैसर्गिक प्रथिनं मिळतात, कोरडेपणा कमी होतो आणि केस मऊ होतात.
हा हेअर पॅक लावल्यानंतर, रक्ताभिसरण सुधारण्यासाठी केसांच्या मुळांना हलक्या हातानं मसाज करा. हा पॅक केसांवर किमान अर्धा तास राहू द्या. नंतर केस धुण्यासाठी सौम्य किंवा सल्फेट-मुक्त शाम्पू वापरा.
Meditation : ध्यानधारणा करण्याचं महत्त्व, शारीरिक - भावनिक आरोग्यासाठी उत्तम
केस धुताना कोमट पाणी वापरणं चांगलं, कारण यामुळे केसांचा नैसर्गिक ओलावा टिकून राहण्यास मदत होते. आठवड्यातून एकदा असं केल्यानं केसांमधे चांगला बदल दिसून येईल.
केस विंचरण्याची योग्य पद्धत - केस विंचरण्यासाठी नेहमी रुंद दात असलेला लाकडी कंगवा किंवा रुंद दात असलेला प्लास्टिकचा कंगवा वापरा. बारीक दात असलेला कंगवा केस वापरल्यानं केस ओढले जातात आणि केस तुटतात.
नेहमी खालून वरच्या दिशेनं कंगवा करा, कारण यामुळे केसांवरचा दाब कमी होतो. लाकडी कंगवा वापरल्यानं टाळूवरील नैसर्गिक तेलांचं समान वितरण होण्यास मदत होतं आणि केसांना चमक येते.
