थंड वारे त्वचेतील ओलावा कमी करतात, ज्यामुळे कोरडेपणा येतो. कोरडेपणामुळे ओठ काळे होऊ शकतात. लिपस्टिकचा जास्त वापर किंवा धूम्रपान केल्यानंही ओठ काळे होतात आणि फाटू शकतात. यासाठी एक घरगुती लिप बाम बनवण्याची प्रक्रिया जाणून घेऊया. YouTuber पूनम देवनानी यांनी एक व्हिडिओ शेअर केला आहे.
Bloating: पोटफुगीवर नैसर्गिक उत्तर, घरगुती हेल्थ ड्रिंकचा वापर ठरेल परिणामकारक
advertisement
होममेड लिप बामसाठी साहित्य - बीट, गुलाबाच्या पाकळ्या, नारळाचं तेल, बदाम तेल, कोरफड गर आणि पेट्रोलियम जेली आणि गुलाबपाणी
लिप बाम कसा बनवायचा पाहूया - हा लिप बाम बनवायला खूप सोपा आहे. प्रथम, बीट किसून घ्या.
मिश्रणात गुलाबपाणी आणि गुलाबाच्या पाकळ्या घाला आणि मिक्सरमधे बारीक करा. मिश्रण कापडातून गाळून घ्या.
Coconut Oil : बहुगुणी नारळाचं तेल, त्वचा, दातांसाठीही उपयुक्त, कल्पतरुचे फायदे
यामधे नारळ तेल आणि बदाम तेल चांगलं मिसळा. नंतर, मिश्रणात कोरफड गर आणि पेट्रोलियम जेली घाला.
एका भांड्यात पाणी गरम करा आणि त्यात या मिश्रणाची वाटी ठेवा. अगदी काही मिनिटांत तुमचा लिप बाम तयार आहे. काचेच्या डब्यात किंवा बाटलीत काढून ठेवू शकता.
हा नैसर्गिक लिप बाम रोज वापरु शकता. त्यात कोणतंही रसायन नसल्यानं बाम ओठांसाठी पूर्णपणे सुरक्षित आहे. बाम दररोज लावल्यानं ओठ लवकर गुलाबी आणि मऊ होतील.
