काही नैसर्गिक आणि सुरक्षित उपाय मायग्रेन, सायनसचा त्रास कमी करण्यासाठी उपयुक्त ठरु शकतात. यातला एक महत्त्वाचा उपाय म्हणजे तेल. पेपरमिंट ऑइल, लव्हेंडर ऑईल, निलगिरी ऑईल, लेमनग्रास ऑईल या तेलांमुळे वेदना कमी होते. मन शांत होतं आणि शरीराला आराम मिळतो.
पेपरमिंट ऑइल
पेपरमिंट ऑइलमधे मेन्थॉल असतं, यामुळे नसा शांत होतात आणि मायग्रेनचा त्रास कमी होतो. नारळाच्या तेलात पेपरमिंट ऑइलचे एक किंवा दोन थेंब मिसळा आणि कपाळावर, कानाच्या कोपऱ्यांवर आणि मानेवर हलक्या हातानं मालिश करा. यामुळे तुम्हाला थंड वाटेल आणि डोकेदुखी हळूहळू कमी होण्यास मदत होईल.
advertisement
लव्हेंडर ऑईल
लव्हेंडर ऑईलमुळे ताण आणि चिंता कमी होते, ज्यामुळे मायग्रेनची तीव्रता कमी होते. रात्री झोपण्यापूर्वी गरम पाण्यात काही थेंब टाकून वाफ घ्या किंवा उशीवर एक थेंब टाका. यामुळे तुम्हाला चांगली झोप येईल आणि वेदनांपासून आराम मिळेल.
निलगिरी ऑईल
सायनसच्या समस्यांमधे हे तेल खूप प्रभावी आहे. यामुळे बंद नाक उघडतं आणि श्वास घेणं सोपं होतं. गरम पाण्यात चार - पाच थेंब घाला आणि वाफ श्वासानं घ्या. यामुळे बंद नाक उघडेल आणि डोक्यातील जडपणा कमी होईल.
लेमनग्रास ऑईल
या तेलानं मायग्रेनला चालना देणारा ताण कमी होतो आणि मूड सुधारतो. डिफ्यूझरमध्ये वापरा किंवा हलक्या तेलात मिसळा आणि मानेवर आणि पाठीवर मालिश करा.
Skin Care : चेहऱ्याची काळजी घेण्यासाठी वापरा फेसपॅक, चेहऱ्याचा पोतही राहिल चांगला
टी ट्री ऑईल - टी ट्री ऑईलमुळे बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारा पदार्थ असतो. यामुळे सायनस संसर्ग कमी करण्यास मदत होते. गरम पाण्यात काही थेंब घाला आणि वाफ घ्या किंवा तेलात टी ट्री ऑईल मिसळा आणि नाकाजवळ मालिश करा.
या गोष्टी लक्षात ठेवा:
ही तेलं थेट त्वचेवर लावू नका, नेहमी दुसऱ्या नेहमीच्या वापराच्या तेलात म्हणजेच नारळ किंवा बदाम तेलात मिसळून वापरा. कोणत्याही तेलाची अॅलर्जी असेल तर ते वापरू नका. गर्भवती महिला किंवा मुलांनी हे उपाय करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.