Health Tips : सर्व्हायकल स्पॉन्डिलायोसिसवर करा आयुर्वेदिक उपायांनी मात, लक्षणं, उपचारांची सविस्तर माहिती

Last Updated:

मान, खांदे आणि पाठीत सतत वेदना होणं, हातांत मुंग्या येणं किंवा बधीर होणं, डोकेदुखी आणि चक्कर येणं, मान वळवायला त्रास होणं, थकवा आणि अशक्तपणा आणि कधीकधी दृष्टी अंधुक होणं आणि निद्रानाश यासारख्या समस्या सर्व्हायकल स्पॉन्डिलायटिसमुळे जाणवू शकतात.

News18
News18
मुंबई : सध्याचं युग डिजिटल आहे, त्यामुळे आजच्या काळात, मोबाईल आणि संगणकाचा वापर होतो, काही वेळा तो गरजेपेक्षा जास्त होतो, तसंच तासन्तास वाकून काम करणं आणि चुकीची जीवनशैली यामुळे सर्व्हायकल स्पॉन्डिलायोसिसची समस्या झपाट्यानं वाढते आहे.
हा आजार मान आणि मणक्याशी संबंधित आहे, ज्यामुळे वेदना होतातच, जीवनाच्या गुणवत्तेवरही वाईट परिणाम होतो. मानेमध्ये असलेल्या मणक्याच्या भागाला 'सर्व्हायकल स्पाइन' म्हणतात. यामधून डोक्याला आधार दिला जातो आणि मेंदूतून संपूर्ण शरीरात संदेश प्रसारित केला जातो.
या कशेरुका किंवा डिस्कमधे झीज होते, जळजळ किंवा दाब असतो तेव्हा त्याला सर्व्हायकल स्पॉन्डिलायोसि म्हणतात. या समस्येचं सर्वात मोठं कारण म्हणजे चुकीच्या स्थितीत बराच वेळ बसणं. वाकून मोबाईल किंवा लॅपटॉप वापरल्यानं मानेवर सतत दबाव येतो.
advertisement
याशिवाय, अपघात किंवा पडल्यामुळे झालेल्या दुखापती, चाळिशीनंतर हाडं आणि डिस्क कमकुवत होणं, ताणतणाव आणि कॅल्शियम, व्हिटॅमिन डी आणि मॅग्नेशियमची कमतरता यामुळे देखील त्रास होऊ शकतो.
मान, खांदे आणि पाठीत सतत वेदना होणं, हातांत मुंग्या येणं किंवा बधीर होणं, डोकेदुखी आणि चक्कर येणं, मान वळवायला त्रास होणं, थकवा आणि अशक्तपणा आणि कधीकधी दृष्टी अंधुक होणं आणि निद्रानाश यासारख्या समस्या सर्व्हायकल स्पॉन्डिलायोसिमुळे जाणवू शकतात.
advertisement
आयुर्वेदात, यावर उपचार सांगितलेत. हे दुखणं वात दोषाच्या वाढीशी संबंधित आहे. वात दोष वाढतो तेव्हा नसा आणि कशेरुका कमकुवत होतात आणि वेदना, कडकपणा आणि सूज निर्माण करतात. आयुर्वेदानुसार, वात दोष संतुलित करणं हा या आजारावर कायमचा उपाय आहे.
यासाठी एका तव्यावर ओवा गरम करून तो कापडात बांधा आणि नंतर मानेवर लावा. यामुळे वेदना आणि ताठरपणा कमी होतो.
advertisement
- लसूण मोहरीच्या तेलात उकळून मानेला मालिश करा. यामुळे रक्ताभिसरण वाढतं आणि सूज कमी होते.
- गूळवेल, हळद आणि आल्याचा काढा प्यायल्यानं शरीरातील सूज आणि वेदना कमी होतात.
- मेथीचे दाणे रात्रभर भिजवून ठेवा आणि सकाळी ते चावा किंवा दुधात मिसळून प्या. यामुळे हाडं आणि नसा मजबूत होतात.
advertisement
- भुजंगासन, ताडासन, मकरासन यासारख्या योगासनांमुळे वेदनेपासून आराम मिळतो.
- कोमट पाण्यानं आंघोळ केल्यानं किंवा गरम पाण्याची पिसवी लावल्यानं स्नायूंचा ताण कमी होतो.
- दररोज पंधरा ते वीस मिनिटं सूर्यप्रकाश अंगावर घेतल्यानं व्हिटॅमिन डीची कमतरता दूर होते.
याशिवाय आहारात दूध, हिरव्या भाज्या, तीळ, बदाम आणि कडधान्ये यांचा समावेश करा. उपचारांसोबतच जीवनशैलीत बदल करणे देखील आवश्यक आहे. जास्त वेळ मोबाईल किंवा लॅपटॉप वापरणं टाळा. कामामुळे बसणं आवश्यक असेल तर, दर तीस मिनिटांनी मान वळवा. झोपताना खूप उंच किंवा खूप खाली उशी वापरू नका. तणावापासून दूर राहणं देखील महत्त्वाचं आहे, कारण यामुळे समस्या अधिक गंभीर बनवू शकते.
advertisement
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Health Tips : सर्व्हायकल स्पॉन्डिलायोसिसवर करा आयुर्वेदिक उपायांनी मात, लक्षणं, उपचारांची सविस्तर माहिती
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement