मायग्रेनची लक्षणं व्यक्तीपरत्वे वेगवेगळी असली तरी, कधीकधी डोकं दुखणं हे मायग्रेनमुळे होतंय की, दुसऱ्या कारणामुळे हे ठरवणं कठीण असतं. डोकेदुखी इतकी तीव्र असते की कधीकधी ती एखाद्या व्यक्तीला रोजची कामंही करता येत नाहीत.
Digestion: पचनाच्या समस्येवर करा झटपट उपाय, पोटाला लगेच मिळेल आराम
मायग्रेनमुळे आवाज आणि प्रकाशही सहन होत नाही. मायग्रेनमुळे काहींना मळमळ आणि उलट्या देखील होतात. अनेकांना बोलण्यात अडचण येते किंवा हाताच्या किंवा पायाच्या एका बाजूला अशक्तपणा जाणवतो.
advertisement
ताण - ताण हा मायग्रेनचा प्रमुख ट्रिगर आहे. योग, ध्यान किंवा दीर्घ श्वसन करुन ताण कमी करता येऊ शकतो. यामुळे मन शांत होण्यास मदत होते.
चांगली झोप - झोपेचा अभाव हे देखील मायग्रेन होण्याचं कारण ठरू शकतं. यासाठी, दररोज रात्री सात ते आठ तास झोप घेणं महत्वाचं आहे. यामुळे मन शांत होतं आणि तणाव कमी होण्यास मदत होते.
हायड्रेशन - पाणी कमी प्यायलं तर मायग्रेनचा त्रास होऊ शकतो. त्यामुळे केवळ मायग्रेनसाठी नाही एकूणच तब्येतीसाठी पुरेसं पाणी पिण्याकडे लक्ष द्या.
काही पदार्थ टाळा - चीज, प्रक्रिया केलेले पदार्थ, रेड वाईन आणि काही प्रकारचे प्रिझर्वेटिव्ह्जमुळे मायग्रेनचा त्रास वाढू शकतो.
Skin Care : कोरड्या होणाऱ्या त्वचेसाठी खास उपाय, आहारतज्ज्ञांचा मोलाचा सल्ला
आहार - ताजं अन्न, भाज्या, संपूर्ण धान्याचा वापर आणि लीन प्रोटिनमुळे शरीराचं पोषण होतं आणि यामुळे मायग्रेनच्या झटक्यापासून आराम मिळतो. यासोबतच, वात, पित्त आणि कफ या तीन दोषांची विशेष काळजी घेमं गरजेचं आहे.
मायग्रेनपासून आराम देणाऱ्या आयुर्वेदिक औषधी वनस्पती - ब्राह्मी, अश्वगंधा, आलं आणि तुळस तसंच देशी तूप आणि बदामही उपयुक्त ठरतात.
याव्यतिरिक्त, आयुर्वेदात पंचकर्म थेरपी देखील मायग्रेनपासून मुक्त होण्यासाठी खूप परिणामकारक मानली जाते. ही एक डिटॉक्सिफिकेशन प्रक्रिया आहे, यामुळे शरीरात जमा झालेले विषारी पदार्थ काढून टाकणं शक्य होतं.
