Digestion : अ‍ॅसिडिटी आणि पोटात गडबड ? घरगुती उपायांनी पोट राहिल स्वस्थ, हे तीन उपाय लक्षात ठेवा

Last Updated:

पचनाच्या समस्या असतील आणि तुम्ही घरगुती उपाय शोधत असाल तर घरी उपलब्ध असलेल्या काही नैसर्गिक गोष्टी वापरून ही समस्या सहज कमी करता येते. नारळ पाणी, केळं, मध आणि कोमट पाणी, थंड दूध या उपायांनी पोटाला आराम मिळतो. 

News18
News18
मुंबई : आम्लपित्त होणं, पोट जड वाटणं, पचन नीट न होणं यामुळे अस्वस्थ वाटतं. सिरप किंवा गोळ्या घेण्यापेक्षा काही घरगुती उपाय करुन पाहा.
पचनाच्या समस्या असतील आणि तुम्ही घरगुती उपाय शोधत असाल तर घरी उपलब्ध असलेल्या काही नैसर्गिक गोष्टी वापरून ही समस्या सहज कमी करता येते. नारळ पाणी, केळं, मध आणि कोमट पाणी, थंड दूध या उपायांनी पोटाला आराम मिळतो.
मध आणि कोमट पाणी - कोमट पाण्यात एक चमचा मध मिसळून प्यायल्यानं गॅस आणि पोटफुगी कमी होण्यास मदत होते. कोमट पाणी पचन सुधारते. मधातील दाहक-विरोधी गुणधर्म पोटाच्या आवरणांना आराम देतात.
advertisement
थंड दूध - थंड दुधानं पोटातील अतिरिक्त आम्ल कमी करणं शक्य होतं. आम्लपित्त आणि छातीत जळजळ यासारख्या समस्यांपासून यामुळे आराम मिळतो. दुधातील कॅल्शियम आणि प्रथिनांमुळे पोटातील आम्ल काही प्रमाणात निष्क्रिय होतं. यामुळे पोटदुखी तात्पुरती कमी होऊ शकते. पण ज्यांना लॅक्टोज या दुधातल्या घटकाचा त्रास होतो, त्यांनी दूध प्यायलं तर ही समस्या वाढू शकते. तसंच तुम्हाला सर्दी, फ्लू किंवा खोकला असेल तर थंड दूध पिणं टाळा, कारण यामुळे कफ वाढण्याची शक्यता असते.
advertisement
केळी - पोटात सूज येणं आणि गॅस होणे यासाठी केळी खाणं खूप फायदेशीर ठरू शकतं. केळ्यात नैसर्गिक अँटासिड गुणधर्म असतात, ज्यामुळे पोटातील आम्ल संतुलित करण्यास मदत होते.
नारळ पाणी - नारळाच्या पाण्यात नैसर्गिक अल्कधर्मी गुणधर्म असतात, यामुळे पोटातील अतिरिक्त आम्ल उत्पादन कमी व्हायला मदत होते. नारळ पाण्यामुळे पोटाच्या आवरणाला आराम मिळतो आणि जळजळ कमी होते.
view comments
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Digestion : अ‍ॅसिडिटी आणि पोटात गडबड ? घरगुती उपायांनी पोट राहिल स्वस्थ, हे तीन उपाय लक्षात ठेवा
Next Article
advertisement
Gold Price Prediction : नव्या वर्षाआधीच सोनं All Time High गाठणार! प्रति तोळा किती महागणार? एक्सपर्टचा धक्कादायक अंदाज
नव्या वर्षाआधीच सोनं All Time High गाठणार! प्रति तोळा किती महागणार? एक्सपर्टचा ध
  • नव्या वर्षाआधीच सोनं All Time High गाठणार! प्रति तोळा किती महागणार? एक्सपर्टचा ध

  • नव्या वर्षाआधीच सोनं All Time High गाठणार! प्रति तोळा किती महागणार? एक्सपर्टचा ध

  • नव्या वर्षाआधीच सोनं All Time High गाठणार! प्रति तोळा किती महागणार? एक्सपर्टचा ध

View All
advertisement