advertisement

Retro Walking : सरळ नाही, उलटं चाला, वाचा रेट्रो वॉकिंगचे फायदे, शरीर आणि मनासाठीही उपयुक्त

Last Updated:

रेट्रो वॉकिंगमुळे शरीराला जास्त श्रम पडतात. यामुळे ऑक्सिजनची मागणी वाढते आणि हृदयाचे ठोके वाढतात. म्हणूनच रेट्रो वॉकिंगमुळे नियमित चालण्यापेक्षा कॅलरीज लवकर बर्न होतात. रेट्रो वॉकिंगचा शरीर आणि मनावर खोलवर परिणाम होतो असं नॅशनल लायब्ररी ऑफ मेडिसिनमधे प्रकाशित झालेल्या एका अभ्यासातून समोर आलं आहे.

News18
News18
मुंबई : व्यायाम म्हणून रोज चालत असाल तर शरीर आणि मनाला आणखी चार्ज अप करण्यासाठी रेट्रो वॉकिंग हा बदल करुन पाहता येईल.
रेट्रो वॉकिंग म्हणजे उलट चालणं. उलटं चालण्याचे अनेक फायदे आहेत आणि हे दररोज केल्यानं तुम्हाला आणखी फिट वाटेल. रेट्रो वॉकिंगमुळे शरीराला जास्त श्रम पडतात. यामुळे ऑक्सिजनची मागणी वाढते आणि हृदयाचे ठोके वाढतात. म्हणूनच रेट्रो वॉकिंगमुळे नियमित चालण्यापेक्षा कॅलरीज लवकर बर्न होतात. रेट्रो वॉकिंगचा शरीर आणि मनावर खोलवर परिणाम होतो असं नॅशनल लायब्ररी ऑफ मेडिसिनमधे प्रकाशित झालेल्या एका अभ्यासातून समोर आलं आहे.
advertisement
हृदय आणि फुफ्फुसांना बळकटी - रेट्रो वॉकिंगमुळे हृदय आणि फुफ्फुसांवर थोडा अतिरिक्त ताण पडतो, ज्यामुळे हृदय आणि फुफ्फुसांची क्षमता हळूहळू वाढते. नियमित सराव केल्यानं कार्डिओ फिटनेस आणि स्टॅमिना वाढतो. गुडघे किंवा पाठीच्या खालच्या भागात समस्या असलेल्यांसाठी हे विशेषतः फायदेशीर आहे.
advertisement
संतुलन आणि समन्वय -  रेट्रो वॉकिंगमुळे शरीराला सतत संतुलन राखण्यास प्रशिक्षित केलं जातं. यामुळे शरीराचा समन्वय सुधारतो. हे विशेषतः वृद्धांसाठी, दुखापतीतून बरे होणाऱ्यांसाठी किंवा पडण्याची भीती असलेल्यांसाठी फायदेशीर आहे.
मेंदूला चालना - रेट्रो वॉकिंगमुळे मूड नियमन आणि विचार करण्यात गुंतलेले मेंदूचे भाग सक्रिय होतात. एकाग्रता, स्मरणशक्ती आणि आकलनशक्तीवर याचा सकारात्मक परिणाम होतो. शरीर आणि मनासाठीही हा चांगला व्यायाम आहे.
advertisement
हळूहळू आणि लहान पावलांनी सुरुवात करा - ट्रेडमिलवर, सुरक्षित जागेत हळूहळू सराव करा. जिथे चालता ती जागा सपाट आणि मोकळी असावी जेणेकरून अडखळण्याचा किंवा पडण्याचा धोका राहणार नाही.
सांधे, संतुलन किंवा पूर्वीची दुखापत झाली असेल, तर सुरुवात करण्यापूर्वी डॉक्टरांचा किंवा फिजिओथेरपिस्टचा सल्ला घ्या.
view comments
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Retro Walking : सरळ नाही, उलटं चाला, वाचा रेट्रो वॉकिंगचे फायदे, शरीर आणि मनासाठीही उपयुक्त
Next Article
PBKS vs GT : आयपीएलच्या इतिहासातली सर्वांत मोठी चूक, 19.5 व्या बॉलला काय घडलं? विश्वास बसणार नाही असा ड्रामा
आयपीएलच्या इतिहासातली सर्वांत मोठी चूक, 19.5 व्या बॉलला काय घडलं? विश्वास बसणार नाही असा ड्रामा
  • आयपीएलमध्ये पहिल्यांदाच असं घडलं

  • शेवटच्या ओव्हरला काय घडलं

  • सोशल मीडियावर प्रचंड टीका

View All
advertisement