Ghee Benefits: हिवाळ्याच्या कोरड्या हवेतही येईल नैसर्गिक ग्लो, त्वचेसाठी वरदान - साजूक तूप, जाणून घेऊया तुपाचे पौष्टिक फायदे

Last Updated:

बाजारात अनेक उत्पादनं असली तरी त्यातल्या रसायनांमुळे त्वचेवर दुष्परिणाम होऊ शकतात. अशावेळी, स्वयंपाकघरातील तूप या समस्येवरच चांगलं आणि परिणामकारक औषध आहे. तुपामधे जीवनसत्त्वं अ, ड, ई आणि के, ओमेगा-3 आणि ओमेगा-9 फॅटी एसिड आढळतात. हे सर्व घटक त्वचा निरोगी आणि दुरुस्त ठेवण्यासाठी उपयुक्त ठरतात.

News18
News18
मुंबई : हिवाळ्यात त्वचेवर ओरखडे येणं, त्वचा खडबडीत होणं, त्वचा कोरडी होणं अशा समस्या जाणवतात. विविध क्रिम यासाठी उपलब्ध असतात, त्यातच एक घरगुती उपाय फायदेशीर ठरु शकतो.
बाजारात अनेक उत्पादनं असली तरी त्यातल्या रसायनांमुळे त्वचेवर दुष्परिणाम होऊ शकतात. अशावेळी, स्वयंपाकघरातील तूप या समस्येवरच चांगलं आणि परिणामकारक औषध आहे. तुपामधे जीवनसत्त्वं अ, ड, ई आणि के, ओमेगा-3 आणि ओमेगा-9 फॅटी एसिड आढळतात. हे सर्व घटक त्वचा निरोगी आणि दुरुस्त ठेवण्यासाठी उपयुक्त ठरतात.
advertisement
त्वचेसाठी तुमचं नाईट केअर रुटिन असेल तर त्यात तूप पण वापरुन पाहा. त्वचा तज्ज्ञांच्या मते, रात्री नाईट क्रीम म्हणून तूप लावणं खूप फायदेशीर आहे. झोपण्यापूर्वी तूप लावल्यानं कोरडेपणा कमी होतो आणि त्वचेला चमक येण्यास मदत होते.
तूप लावण्यासाठी, आधी त्वचा पूर्णपणे स्वच्छ करा आणि बोटांनी त्वचेवर तुपाचा मसाज करा. यामुळे त्वचा हायड्रेटेड राहील आणि केमिकलयुक्त मॉइश्चरायझर्स वापरण्याची गरज भासणार नाही.
advertisement
हिवाळ्यात बॉडी मसाज करणं फायदेशीर मानलं जातं. यासाठी तुपाचा वापर करू शकता. यामुळे त्वचेला आवश्यक असलेले सर्व पोषक घटक मिळतात. मालिशसाठी, तूप थोडंसं गरम करा आणि संपूर्ण शरीरावर लावा.
बाळांना तुपानं मालिश करणं खूप फायदेशीर आहे. हिवाळ्यात टाचांना भेगा पडतात. यासाठीही तूप वापरू शकता. रात्री झोपण्यापूर्वी, टाचा कोमट पाण्यानं स्वच्छ करा, नंतर त्यावर तुपाचा थर लावा आणि झोपा. सकाळी कोमट पाण्यानं पाय धुवा. हे नियमितपणे केलं तर टाचा मऊ व्हायल मदत होईल.
view comments
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Ghee Benefits: हिवाळ्याच्या कोरड्या हवेतही येईल नैसर्गिक ग्लो, त्वचेसाठी वरदान - साजूक तूप, जाणून घेऊया तुपाचे पौष्टिक फायदे
Next Article
advertisement
Gold Price Prediction: सोन्याच्या बाजारात ऐतिहासिक उलथापालथ! १९७९ चीच पुनरावृत्ती? एक्सपर्टचा धडकी भरवणारा अंदाज
सोनं बाजारात ऐतिहासिक उलथापालथ! १९७९ ची पुनरावृत्ती? एक्सपर्टचा धडकी भरवण
  • सोनं बाजारात ऐतिहासिक उलथापालथ! १९७९ ची पुनरावृत्ती? एक्सपर्टचा धडकी भरवण

  • सोनं बाजारात ऐतिहासिक उलथापालथ! १९७९ ची पुनरावृत्ती? एक्सपर्टचा धडकी भरवण

  • सोनं बाजारात ऐतिहासिक उलथापालथ! १९७९ ची पुनरावृत्ती? एक्सपर्टचा धडकी भरवण

View All
advertisement