Skin Care: कोरियन ग्लास क्रिमची जादू आता तुमच्या हातात, जाणून घेऊया कसं तयार करायचं क्रिम
- Published by:Renuka Joshi
Last Updated:
कोरियन ग्लास स्किनविषयी तुम्ही ऐकलंत का ? कोरियन स्किन केअर रुटिन कायम चर्चेत असतं. कोरियन लोकांप्रमाणे आपलीही त्वचा ग्लो करावी असं वाटत असेल तर ही माहिती महत्त्वाची. जाणून घेऊया कोरियन ग्लास स्किन क्रीमबद्दल..हे क्रिम घरी सहज तयार करता येतं.
मुंबई : हवेत बदल झाले की, बदलत्या हवामानाचे, प्रदूषणाचे आणि ताणतणावाचे नकारात्मक परिणाम आपल्या त्वचेवर दिसतात. यामुळे त्वचेवर कधी मुरुमं येतात तर कधी पुरळ येतं. अनेकदा त्वचा कोरडी होते.
कोरियन ग्लास स्किनविषयी तुम्ही ऐकलंत का ? कोरियन स्किन केअर रुटिन कायम चर्चेत असतं. कोरियन लोकांप्रमाणे आपलीही त्वचा ग्लो करावी असं वाटत असेल तर ही माहिती महत्त्वाची. यासाठी अनेक महागडी उत्पादनं आणि क्रीम वापरली जातात. पण याचा बऱ्याच काळासाठी वापर केला तर त्यातल्या रसायनांचे दुष्परिणाम जाणवतात. यासाठी, घरगुती उपचार खूप उपयुक्त ठरतात. कोरियन ग्लास स्किन क्रिम घरी सहज तयार करता येतं. जाणून घेऊया क्रिम बनवण्याची पद्धत.
advertisement
कोरियन ग्लास क्रीमसाठी लागणारं साहित्य - कोरफडीचा गर दोन चमचे, तांदळाचं पाणी एक चमचा यासाठी तांदूळ रात्रभर भिजत ठेवा. एक व्हिटॅमिन ई कॅप्सूल, एक चमचा मध, एक चमचा कच्चं दूध.
कोरियन ग्लास क्रीम घरी बनवणं खूप सोपं आहे. एका स्वच्छ भांड्यात, कोरफडीचा गर दोन चमचे, आणि एक चमचा तांदळाचं पाणी मिसळा, जोपर्यंत एक गुळगुळीत पेस्ट तयार होत नाही तोपर्यंत मिसळा.
advertisement
या मिश्रणात, व्हिटॅमिन ई कॅप्सूल पिळून घ्या. नंतर, मिश्रणात एक चमचा मध आणि एक चमचा कच्चं दूध घाला आणि एक मऊ, गुळगुळीत क्रीम तयार होईपर्यंत मिसळा. कोरियन ग्लास स्किन क्रीम तयार आहे.
झोपण्यापूर्वी चेहरा धुवा आणि नंतर ही क्रीम लावा, बोटांनी चेहऱ्यावर मालिश करा. यानंतर, सकाळी उठून कोमट पाण्यानं चेहरा धुवा. हे नियमितपणे केलं तर त्वचेवर चम येईल. या क्रीममधील घटक त्वचेला हायड्रेट करण्यासाठी मदत करतात.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Nov 29, 2025 9:19 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Skin Care: कोरियन ग्लास क्रिमची जादू आता तुमच्या हातात, जाणून घेऊया कसं तयार करायचं क्रिम








