advertisement

Cycling : एका व्यायामाचे अनेक फायदे, सायकलिंगमुळे तब्येत राहिल चांगली, वाचा सविस्तर

Last Updated:

नॅशनल लायब्ररी ऑफ मेडिसिनच्या मते, सायकल चालवणं म्हणजे फक्त व्यायाम नाही तर सायकलिंगमुळे शरीराला शारीरिक आणि मानसिकदृष्ट्याही असंख्य फायदे मिळतात. सायकलिंगमुळे स्नायूंना बळकटी मिळते, मानसिक शांती मिळते आणि शरीर सक्रिय राहण्यासाठी मदत होते.

News18
News18
मुंबई : तब्येत तंदुरुस्त राहण्यासाठी आहार आणि जीवनशैली व्यवस्थित ठेवणं आवश्यक आहे. जीवनशैलीत महत्त्वाचा भाग आहे व्यायामाचाही. व्यायामाचाच एक प्रकार म्हणजे सायकलिंग. दररोज केवळ 30 मिनिटं नियमितपणे सायकल चालवणं देखील आरोग्यासाठी परिणामकारक आहे.
दररोज तीस मिनिटं सायकल चालवल्यानं अनेक आजारांपासून संरक्षण होईलच, शिवाय येणाऱ्या अनेक वर्षांसाठी तब्येत चांगली राहिल. नॅशनल लायब्ररी ऑफ मेडिसिनच्या मते, सायकल चालवणं म्हणजे फक्त व्यायाम नाही तर सायकलिंगमुळे शरीराला शारीरिक आणि मानसिकदृष्ट्याही असंख्य फायदे मिळतात. सायकलिंगमुळे स्नायूंना बळकटी मिळते, मानसिक शांती मिळते आणि शरीर सक्रिय राहण्यासाठी मदत होते.
advertisement
सायकलिंगमुळे स्नायूंची ताकद, शरीरातील चरबी आणि कोलेस्टेरॉलची पातळी देखील स्थिर राहिली असं एजिंग सेल या जर्नलमधे प्रकाशित झालेल्या संशोधनाच्या निकालांवरून दिसून आलं. याव्यतिरिक्त, पुरुषांमधे टेस्टोस्टेरॉनची पातळी चांगली राहिली. सायकलिंगमुळे वृद्धत्वाचे परिणाम कमी होतात आणि रोगप्रतिकारक शक्तीला चांगली राहण्यासाठी मदत होते असं अभ्यासातून आढळून आलं आहे.
यासाठी, शास्त्रज्ञांनी 55 ते 79 वयोगटातील 125 हौशी सायकलस्वारांची चाचणी केली आणि त्यांची तुलना नियमितपणे व्यायाम न करणाऱ्या विविध वयोगटातील निरोगी प्रौढांशी केली. सायकलस्वार अधिक सक्रिय आणि तंदुरुस्त असल्याचे आढळून आलं.
advertisement
जाणून घेऊया सायकलिंगचे फायदे -
स्नायू बळकट होतात - सायकलिंग हा एक एरोबिक व्यायाम आहे. हृदय, फुफ्फुसं आणि स्नायूंना बळकट करण्यास यामुळे मदत होते. या व्यायामामुळे सांध्यावर जास्त ताण पडत नाही. हा व्यायाम सर्व वयोगटातील लोकांसाठी उपयुक्त आणि सुरक्षित आहे. दररोज तीस मिनिटं हा व्यायाम केल्यानं ऊर्जा आणि कार्यक्षमता वाढते. यामुळे रक्ताभिसरण सुधारतं, त्वचा उजळते आणि सुरकुत्या कमी होतात.
advertisement
मानसिक आरोग्य सुधारण्यासाठी उपयुक्त - सायकल चालवणं मानसिक आरोग्यासाठीही चांगलं आहे. दररोज सायकल चालवल्यानं ताण, चिंता आणि एकटेपणा कमी होण्यास मदत होते. सायकलिंग करताना मिळणारी ताजी हवा, निसर्गाचा सहवास आणि शारीरिक हालचालींमुळे मानसिक शांती वाढते.
हृदयाचं आरोग्य - दररोज तीस मिनिटं सायकल चालवल्यानं हृदयाचं आरोग्य सुधारतं. सायकल चालवल्यानं हृदयाचे ठोके वाढतात, रक्ताभिसरण सुधारतं यामुळे हृदयाचं आरोग्य सुधारायला मदत होते.
advertisement
चांगली झोप - दररोज सायकल चालवल्यानं झोप चांगली येते. सायकलिंगमुळे शरीरातील हार्मोनल संतुलन चांगलं होण्यासाठी मदत होते, मेलाटोनिनचं उत्पादन नियंत्रित होतं आणि चांगली झोप येण्यास मदत होते.
view comments
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Cycling : एका व्यायामाचे अनेक फायदे, सायकलिंगमुळे तब्येत राहिल चांगली, वाचा सविस्तर
Next Article
PBKS vs GT : आयपीएलच्या इतिहासातली सर्वांत मोठी चूक, 19.5 व्या बॉलला काय घडलं? विश्वास बसणार नाही असा ड्रामा
आयपीएलच्या इतिहासातली सर्वांत मोठी चूक, 19.5 व्या बॉलला काय घडलं? विश्वास बसणार नाही असा ड्रामा
  • आयपीएलमध्ये पहिल्यांदाच असं घडलं

  • शेवटच्या ओव्हरला काय घडलं

  • सोशल मीडियावर प्रचंड टीका

View All
advertisement